Numerology : अथक परिश्रमानंतर मिळते आठ मूलांकाच्या लोकांना यश; जाणून घ्या अंकशास्त्र

या संख्येच्या व्यक्तीवर अनेकदा शनीचा प्रभाव दिसून येतो. आठव्या मूलांकाचे लोक बऱ्याचदा काही गैरसमजांना बळी पडतात, म्हणूनच त्यांना कामांमध्ये थोडे उशिराने यश मिळते.

Numerology : अथक परिश्रमानंतर मिळते आठ मूलांकाच्या लोकांना यश; जाणून घ्या अंकशास्त्र
अथक परिश्रमानंतर मिळते आठ मूलांकाच्या लोकांना यश; जाणून घ्या अंकशास्त्र
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 5:55 PM

मुंबई : आठ मूलांक ज्योतिषशास्त्रामध्ये विश्वासाचा अंक मानला जातो. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक आठ असतो. संख्याशास्त्रात शनिदेव आठ मूलांकाचा स्वामी मानला जातो. या संख्येच्या व्यक्तीवर अनेकदा शनीचा प्रभाव दिसून येतो. आठव्या मूलांकाचे लोक बऱ्याचदा काही गैरसमजांना बळी पडतात, म्हणूनच त्यांना कामांमध्ये थोडे उशिराने यश मिळते. या स्वभावामुळे बऱ्याचदा अशा लोकांना एकटे वाटते. Success is achieved through hard work of eight numerology people)

तत्वांशी तडजोड करू नका

आठव्या मूलांकाचे लोक खूप प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असतात. अशा लोकांना बऱ्याचदा कोणत्याही गोष्टीत खोलवर जाणे आणि त्यासंदर्भातील सर्व गोष्टी सखोल शोधायला आवडतात. आठव्या मूलांकाचे लोक त्यांच्या मताला होणाऱ्या कोणत्याही विरोधाची पर्वा करीत नाहीत. तेच ठाम विचार त्यांच्या जीवनात कधी ना कधी तरी महत्वाची भूमिका बजावतात. हे लोक स्वत:चे विचार व आपल्या मतांशी कट्टर आणि तत्त्वांशी कधीही तडजोड करीत नाही. आठ मूलांकाचे लोक आपली भावना इतरांसमोर व्यक्त करण्यात अनेकदा मागे राहतात.

दृढनिश्चय

आठ मूलांक असलेले लोक कोणतीही गोष्ट करण्याचा दृढनिश्चय करतात, त्यावेळी ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. तथापि, त्यांना बऱ्याचदा कठोर परिश्रम आणि संघर्षानंतरच यश मिळते.

या तारखांना काम सुरू करा

आठ मूलांक असलेल्या लोकांनी त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्याही महिन्याच्या 8, 17 वा 26 तारखेला काम सुरू केले पाहिजे. आठवा मूलांक शनीचा असल्याने अशा लोकांसाठी शनिवार अधिक लाभदायी ठरू शकतो. अर्थात शनिवार त्यांच्यादृष्टीने शुभमूहूर्त असतो.

हे रंग दाखवून देतील शुभ परिणाम

काळा, निळा आणि जांभळा हे रंग आठ मूलांकाच्या लोकांसाठी शुभ संकेत देणारे आहेत. शुभतेसाठी आपण कोणत्याही ज्योतिषाला विचारून नीलम घालू शकता. परंतु हे लक्षात घ्या की ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय आणि तपासणी केल्याशिवाय नीलम परिधान करू नका.

ही चूक कधीही करू नका

आठव्या मूलांकाच्या लोकांनी नेहमी त्यांच्या काही उणीवांकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला स्वत:ला ज्या गोष्टी आवडत नाही, त्या गोष्टींचा तुमच्या पत्नीसोबत करण्याचा प्रयत्न करू नका. तिची कधीही फसवणूक करू नका, तिला अंधारात ठेवू नका. कारण तुमच्या गुप्त गोष्टी उघडकीस आल्यानंतर तुम्हाला फार मोठ्या अपमानाचा सामना करावा लागू शकतो.

इतरांवर विसंबून राहू नका

लोकांना भेटताना आणि त्यांच्यासमोर आपले विचार मांडताना संकोच बाळगू नका. तसेच इकडच्या गोष्टी तिकडे करण्याची सवय टाळा. एकाच ठिकाणी राहू नका. सतत वेगवेगळ्या लोकांना भेटा आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करा. आपले काम इतरांच्या भरवशावर कधीही सोडू नका, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रेम प्रकरणापासून दूर रहा

आठ मूलांकाच्या व्यक्तींनी प्रेमप्रकरणात पडू नये. पारंपारिक पद्धतीने लग्न करणे आणि जीवनसाथी निवडणे हेच त्यांच्यासाठी शुभ असल्याचे सिद्ध होते. Success is achieved through hard work of eight numerology people)

इतर बातम्या

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Taliye Landslide : तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची मोठी घोषणा

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.