T20 World Cup : भारतीय संघ 2010 चं क्रिकेट खेळतोय, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची टीका, वासीम जाफरलाही टोला

सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघापासून भारत फार दूर असल्याने पुढील फेरीत पोहचणं अवघड झालं आहे.

T20 World Cup : भारतीय संघ 2010 चं क्रिकेट खेळतोय, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची टीका, वासीम जाफरलाही टोला
IND vs NZ
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:43 AM

मुंबई : यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवत भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळवलं आहे. (‘India playing 2010 cricket’: Michael Vaughan takes a dig at Team India’s batting flops against New Zealand)

सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघापासून भारत फार दूर असल्याने पुढील फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने केवळ 110 धावा केल्या. ज्या पूर्ण करताना न्यूझीलंडला अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. त्यांनी केवळ 2 विकेट्स गमावत 14.3 षटकात या धावा पूर्ण करत 8 विकेट्सनी विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांचा खराब फॉर्म पुन्हा एकदा दिसून आला.

दरम्यान, भारताच्या पराभवामुळे तमाम भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. जगभरातील क्रिकेट तज्ज्ञ, क्रीडा समीक्षक टीम इंडियावर तुटून पडले आहेत. यात सर्वात पुढे आहेत, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन. त्यांनी ट्विट करून भारतीय संघावर हल्ला चढवला असून भारतीय क्रिकेट संघ दशकभर जुनं क्रिकेट खेळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वॉन यांनी दोन ट्विट केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये वॉन यांनी म्हटले आहे की, भारतीय संघ कदाचित या विश्वचषकातून बाहेर पडेल. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले. “भारतीय संघ 2010 चं क्रिकेट खेळत आहे. मात्र तेव्हापासून खेळ बदलला आहे.” दुसऱ्या ट्विटमध्ये वॉनने लिहिले की, ‘भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडू शकतो. संघाची मानसिकता आणि दृष्टीकोन, सर्व कौशल्यांसह, आतापर्यंत चुकीचे ठरले आहे.”

वासीम जाफरला टोला

वॉन एवढ्यावरच थांबला नाही. त्याने भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफरलाही टोला लगावला आहे. ट्विटरवर या दोघांमध्ये नेहमीच वाद होत असतात. दोघेही ट्विटरवर विनोद करत असतात. वॉनने जाफरच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडली नाही आणि ट्विट करून जाफरला त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. वॉनने ट्विट केले की, “वसीम जाफर कसा आहेस?”.

भारताची खराब फलंदाजी

सर्वात आधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जिंकणारा संघ निवडत असल्याप्रमाणे गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यावेळी सूर्यकुमारच्या जागी इशान संघात असल्याने सलामीला राहुलसोबत तो आला. पण तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र एक-एक करत सर्व फलंदाज तंबूत परतले. संपूर्ण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दीक पंड्या (23) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 26) यांनीच केल्या. ज्यामुळे भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडचा पहिला विजय

यानंतर अवघ्या 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी दाखवली. सलामीवीर मार्टीन गप्टीलने 3 चौकार लगावत 20 धावा केल्या. चौथ्या षटकात बुमराहने त्याची विकेट घेतली. ज्यावेळी भारताच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर दुसरा सलमीवीर मिचेलने कर्णधार केनच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. तर केनने 31 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेने 2 धावांची मदत करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात बुमराह सोडता भारताच्या गोलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने न्यूझीलंडचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.

सेमीफायनलमध्ये पोहचणं अवघड

भारत असलेल्या ग्रुपमध्ये पाकिस्तानने 3 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर अफगाणिस्तानने 3 पैकी 2 सामने जिंकत दुसरं स्थान मिळवलं आहे. तर न्यूझीलंड आणि नामिबिया एक एक विजय मिळवत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. ज्यानंतर भारत आणि स्कॉटलंड पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. दरम्यान भारत पाचव्या स्थानावर दोन पराभवांसह असून इतर सर्व सामने जिंकला तरी पाक आणि अफगाणिस्तानला मागे टाकणं अवघड आहे. तसंच न्यूझीलंडचा संघही आजच्या विजयानंतर गिअर अप करुन अफगाणिस्तानला मागे टाकून पुढे जाऊ शकतो.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?

लाईव्ह मॅचदरम्यान विराट कोहलीने मारली पलटी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ज्याचं कौतुक केलं त्याचीच उडवली थट्टा

T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं

(‘India playing 2010 cricket’: Michael Vaughan takes a dig at Team India’s batting flops against New Zealand)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.