India vs New Zealand T20 World Cup Result: भारत न्यूझीलंडकडून 8 विकेट्सनी पराभूत, सेमी-फायनलच्या आशाही मावळल्या

टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताला पराभूत केलं आहे. सलग दोन पराभवांमुळे गटातील इतर गट भारताच्या पुढे पोहोचले आहेत. त्यामुळे भारताच्या पुढील फेरीच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.

India vs New Zealand T20 World Cup Result: भारत न्यूझीलंडकडून 8 विकेट्सनी पराभूत, सेमी-फायनलच्या आशाही मावळल्या
सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने उत्कृष्ट 49 धावा झळकावल्या

T20 World Cup 2021 : यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवत भारताचं पुढील फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळवलं आहे.

सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचला आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघापासून भारत फार दूर असल्याने पुढील फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने केवळ 110 धावा केल्या. ज्या पूर्ण करताना न्यूझीलंडला अधिक मेहनत घ्यावी लागील नाही. त्यांनी केवळ 2 विकेट्स गमावत  14.3 ओव्हरमध्ये या धावा पूर्ण करत 8 विकेट्सनी विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांचा खराब फॉर्म पुन्हा एकदा दिसून आला.

भारताची खराब फलंदाजी

सर्वात आधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जिंकणारा संघ निवडत असल्याप्रमाणे गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यावेळी सूर्यकुमारच्या जागी इशान संघात असल्याने सलामीला राहुलसोबत तो आला. पण तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र एक-एक करत सर्व फलंदाज तंबूत परतले. संपूर्ण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दीक पंड्या (23) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 26) यांनीच केल्या. ज्यामुळे भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडचा पहिला विजय

यानंतर अवघ्या 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी दाखवली. सलामीवीर मार्टीन गप्टीलने 3 चौकार लगावत 20 धावा केल्या. चौथ्या षटकात बुमराहने त्याची विकेट घेतली. ज्यावेळी भारताच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर दुसरा सलमीवीर मिचेलने कर्णधार केनच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. तर केनने 31 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेने 2 धावांची मदत करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात बुमराह सोडता भारताच्या गोलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने न्यूझीलंडचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.

सेमीफायनलमध्ये पोहचणं अवघड

भारत असलेल्या ग्रुपमध्ये पाकिस्तानने 3 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर अफगाणिस्तानने 3 पैकी 2 सामने जिंकत दुसरं स्थान मिळवलं आहे. तर न्यूझीलंड आणि नामिबिया एक एक विजय मिळवत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. ज्यानंतर भारत आणि स्कॉटलंड पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. दरम्यान भारत पाचव्या स्थानावर दोन पराभवांसह असून इतर सर्व सामने जिंकला तरी पाक आणि अफगाणिस्तानला मागे टाकणं अवघड आहे. तसंच न्यूझीलंडचा संघही आजच्या विजयानंतर गिअर अप करुन अफगाणिस्तानला मागे टाकून पुढे जाऊ शकतो.

टी 20 विश्वचषकाची सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

इतर बातम्या

Asghar Afghan Retired: संघाला गरज असताना मोठ्या शस्त्रक्रियेनंतर 14 दिवसांत मैदानावर परतला, 12 वर्षानंतर निवृत्त होताना अश्रू अनावर

AFG vs NAM, T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा नामिबियावर 62 धावांनी मोठा विजय, गुणतालिकेत दुसरं स्थान

आसीफ अलीच्या गनशॉट अ‍ॅक्शनवर भडकलेल्या राजदूतांना पाकिस्तानातून उत्तर, थेट एमएस धोनीशी तुलना

(India vs New Zealand T20 world cup Match Result 2021 Know Who T20 world cup Match Highlights)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI