आनंद दिघे यांची प्रॉपर्टी किती? उद्धव ठाकरे यांचा प्रश्न, एकनाथ शिंदे यांनी काय केला गौप्यस्फोट?
आझाद मैदान येथील दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केलाय. आनंद दिघे यांचे पंख छाटण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचा मी साक्षीदार आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई | 24 ऑक्टोंबर 2023 : २६ जुलै २००५ मध्ये बांद्र्यात पाणी साचले होते. त्यावेळी तुम्ही बाळासाहेब यांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले. बाळासाहेब मातोश्रीमध्ये एकटे होते. यांची नियत कशी? अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आनंद दिघे एका बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल चांगले बोलले. त्यांचे कर्तुत्व तेवढे होते. तुमचे काय होते? पण ते ऐकून दिघे यांचे पंख छाटण्याचे काम सुरु झाले. त्यांना ज्या वागवले त्याचा मी साक्षीदार आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाल्यानंतर आले नाहीत. बघायला आले नाही. आम्ही समाधी बांधली. त्या समाधीलाही आले नाहीत. मी गेलो तेव्हा विचारले आनंद दिघे यांची प्रॉपर्टी किती आहे. तो फकीर माणूस. त्याची प्रॉपर्टी किती असणार? आता तिकडे छाती बडवून सांगता मर्द आहोत, मर्द आहोत. पण मर्द आहोत हे का सांगावं लागतंय? ही सभा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची आहे. खरे मर्द इकडे आहेत आणि तिकडे आहेत ते बुजरे, कारकून आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

