AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : भरदिवसा दरवाजा तोडून घरात घुसायचा, मग लाखोंचा ऐवज लुटून पसार व्हायचा !

दिवसाढवळ्या रेकी करुन बंद घर फोडायचा आणि मुद्देमाल घेऊन लंपास व्हायचा. पण पोलिसांनी अवघ्या काही तासातच यशस्वी कामगिरी पार पाडत आरोपीला पकडले.

Mumbai Crime : भरदिवसा दरवाजा तोडून घरात घुसायचा, मग लाखोंचा ऐवज लुटून पसार व्हायचा !
घरफोडी करुन फरार चोरट्याला अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 16, 2023 | 10:21 AM
Share

मुंबई : भरदिवसा दरवाजा तोडून घरात चोरी करुन पसार होणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकण्यास बांगूर नगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त केले आहेत. रईस अब्दुल आहद शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. या आरोपींविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 28 हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. बांगूर नगर पोलिसांनी मालवणी परिसरात तंत्रज्ञान आणि कुत्र्याच्या मदतीने आरोपीला अटक केली. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली

आरोपीने बांगूर नगर परिसरातील अलका मल्होत्रा या महिलेच्या घरी चोरीची घटना घडली होती. चोरट्याने मल्होत्रा यांच्या घरातून 10 लाखांची रोकड आणि दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी मल्होत्रा यांनी बांगूर नगर पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

घटनेच्या काही तासात आरोपीला अटक

सीसीटीव्हीवरुन आरोपीची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले. तपासादरम्यान आरोपी मालवणी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने अवघ्या काही तासात आरोपीला मालवणी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. आरोपीने याआधी किती चोऱ्या केल्या, किती मुद्देमाल लंपास केला याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे, पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बांगुरनगर लिंक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि योगेश रामेकर, सपोफौ प्रमोद दळवी, पो.ह. राजेंद्र गळवे, पो.ना. विनय सोनावणे, पो.शि. संदिप तिकांडे, पो.शि. नईम शेख यांनी सदर कामगिरी पार पाडली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.