Ajay Devgn | अजय देवगणच्या नव्या चित्रपटाची घोषणा, आणखी एका साऊथ चित्रपटाचा रिमेक बनवणार!

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याने 2021साठी आपला नवीन प्रोजेक्ट जाहीर केला आहे. अजय साऊथची सुपरहिट फिल्म ‘नंदी’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगु भाषेत प्रदर्शित झाला होता.

Ajay Devgn | अजय देवगणच्या नव्या चित्रपटाची घोषणा, आणखी एका साऊथ चित्रपटाचा रिमेक बनवणार!
अजय देवगण

मुंबई : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याने 2021साठी आपला नवीन प्रोजेक्ट जाहीर केला आहे. अजय साऊथची सुपरहिट फिल्म ‘नंदी’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगु भाषेत प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट निर्माता आणि वितरक दिल राजू यांनी बनवला होता. दिल राजू यांनी अलीकडेच ‘वकील साहब’ हा चित्रपट बनवला होता, जो अमिताभ बच्चन यांच्या ‘पिंक’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणने काम केले होते (Ajay Devgn announces his new project remake of south movie Nandi).

नंदी म्हणजे काय?

तेलुगु सिनेमाची स्टार अल्लारी नरेश याने नंदी या चित्रपटात धमाकेदार अभिनय केला होता. हा चित्रपट एका अशा माणसाची कहाणी आहे, ज्याच्यावर तुरुंगात असताना बरेच अत्याचार केले जातात आणि मग तो स्वतःवर झालेल्या अन्याया विरोधात लढतो. अजय देवगणला हा चित्रपट इतका आवडला आहे की. त्याने हिंदीमध्ये रीमेकचे हक्क विकत घेतले आहेत आणि आता 2021मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अजय देवगण सोबत दिल राजू, कुलदीप राठोड आणि पराग देसाई हेदेखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पराग देसाई हे अजय देवगणचे पब्लिसिस्ट आहेत आणि जवळजवळ दशकभर ते त्यांच्याबरोबर काम करत आहेत.

अजयचे पुढचे चित्रपट

अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाचे शूट अद्याप थोडेसे शिल्लक आहे. मुंबईतील तोक्ते वादळामुळे त्याचा सेट खराब झाला होता. ज्यामुळे हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला. बोनी कपूर अजयच्या या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

याशिवाय अजयचा ‘भुज’ हा चित्रपटही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारला 112 कोटी रुपयांना विकला आहे, परंतु सध्याच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या चित्रपटाचे बजेट सुमारे 80 कोटी आहे. याशिवाय यातून अजय देवगण ओटीटीवर पदार्पण करणार आहे आणि या प्रोजेक्टला ‘रुद्र’ असे नाव देण्यात आले आहे. अजयनेही यासाठी शूटिंग सुरू केली आहे. अजय देवगण अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एक चित्रपट करत आहेत. ज्याचा तो स्वत: दिग्दर्शक देखील आहे. सध्या तो चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे.

(Ajay Devgn announces his new project remake of south movie Nandi)

हेही वाचा :

कोरोनाशी झुंज यशस्वी, तब्बल 55 दिवसांनी अभिनेता अनिरुद्ध दवे घरी परतला!

Rakhi Sawant : बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री घेण्यासाठी राखी उत्सुक, म्हणाली यावेळी पती रितेशसोबत यायची इच्छा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI