National Safe Motherhood Day: जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व

| Updated on: Apr 11, 2022 | 5:40 AM

महिलांच्या मातृत्व सुरक्षिततेसाठी दरवर्षी 11 एप्रिलरोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (National Safe Motherhood Day) साजरा करण्यात येतो. व्हाइट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) चा हा उपक्रम आहे. भारत सरकारकडून (Government of India) सर्वप्रथम 2003 मध्ये 11 एप्रिल हा दिवस सुरक्षीत मातृत्व दिन म्हणून साजरी करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली.

National Safe Motherhood Day: जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

महिलांच्या मातृत्व सुरक्षिततेसाठी दरवर्षी 11 एप्रिलरोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (National Safe Motherhood Day) साजरा करण्यात येतो. व्हाइट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) चा हा उपक्रम आहे. भारत सरकारकडून (Government of India) सर्वप्रथम 2003 मध्ये 11 एप्रिल हा दिवस सुरक्षीत मातृत्व दिन म्हणून साजरी करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली, तेव्हापासून दरवर्षी 11 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजर करण्यात येतो. महिलांमध्ये मातृत्वाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी, प्रसुतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा दिली जावी जेणेकरून महिलांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये, या उद्देशानेच दरवर्षी 11 एप्रिलरोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येतो. भारतामध्ये महिलांच्या आरोग्यची स्थिरी भिषण आहे, प्रसूतीदरम्यान अनेक मातांचा मृत्यू होतो, तसेच प्रसूतीनंतर योग्य ती काळजी न घ्येतल्याने अनेक महिलांना विविध आजार होतात. या सर्व प्रकारांना आळा घालून, महिलांच्या वाटेला सुरक्षित मातृत्व यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

दरवर्षी हजारो मातांचा मृत्यू

भारतामध्ये दरवर्षी मुलांना जन्म देताना सरासरी 45 हजारांपेक्षा अधिक महिलांचा मृत्यू होतो. हा आकडा जगात प्रसूतीदरम्यान मृत्यू होणाऱ्या मातांच्या संख्येच्या 12 टक्के इतका आहे. देशभरात एक लाख महिलांमागे प्रसूतीदरम्यान 167 महिलांचा मृत्यू होतो. यातूनच हे चित्र किती भयावह आहे याची कल्पना येते. मात्र अलिकडच्या काळात सुरक्षित मातृत्वाबद्दल जनजागृती होत असल्याने माता मृत्यूचा आकडा कमी होत असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे आपण 1990 पासून ते 2013 पर्यंत माता मृत्यूचे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळवले आहे. अजूनही यावर काम सुरू असून, प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूला आळा घालण्यासी विविध स्तरावर काम सुरू आहे.

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व

दरवर्षी प्रसुतीदरम्यान हजारो मातांचा मृत्यू होतो, याला अनेक घटक कारणीभूत असतात. जसे की, गर्भारपणात महिलेची योग्य काळजी न घेणं, महिलेचं व्यवस्थित पोषण न झाल्यास, महिला अशक्त बनते, अशा महिलेची प्रसुती करण्यात अनेक धोके असतात. प्रसंगी महिलेचा जीव देखील जाऊ शकतो. मुलं जन्माला आल्यानंतर देखील संबंधित महिलेची आणि बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. मुलांचे पोषण व्यवस्थीत झाले नाही तर बालके कुपोषित होतात. त्यामुळे महिलाच्या गर्भधारणेपासून ते बाळाला जन्म दिल्यानंतर आई आणि बाळाची काय काळजी घेतली जावी? यासाठी सरकारने तज्ज्ञांच्या मदतीने कार्यक्रमाची आखणी केली आहे. सरकारतर्फे मातांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सुविधांची त्यांना माहिती व्हावी, त्या सुविधांचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिल रोजी सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यात येतो.

इतर बातम्या

महागाईमुळे ‘या’ देशावर आली होती दहा लाखांची नोट छापण्याची वेळ, सध्या परिस्थिती नियंत्रणात

रिलायन्स कॅपिटलच्या ‘कर्ज निराकरण’ प्रक्रियेबाबत प्रशासन आणि कर्जदार यांच्यात मतभेद ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Startups कंपन्यांना अच्छे दिन; चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीत उभारले 10.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल