AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada Region Election Result 2024 : परळीत धनंजय मुंडे यांचा करिष्मा, इतर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा, महाविकास आघाडीचा धुव्वा

Maharashatra Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील मतदारांनी मोठा उलटफेर केला होता. तर विधानसभा निवडणुकीत ही मराठवाड्याने दे धक्का देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. परळीत धनंजय मुंडे यांच्या घड्याळाचा गजर झाला. तर इतर मतदारसंघात पण महायुतीने मोठी आघाडी घेतली. तर महाविकास आघाडीचा धु्व्वा उडाला.

Marathwada Region Election Result 2024 : परळीत धनंजय मुंडे यांचा करिष्मा, इतर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा, महाविकास आघाडीचा धुव्वा
मराठवाड्यात महायुतीचा झेंडा
| Updated on: Nov 23, 2024 | 2:25 PM
Share

लोकसभेवेळी राज्यातील राजकारणाची दिशा बदलण्याचे काम मराठवाडा आणि विदर्भाने केले. त्यामुळे या दोन प्रदेशातील जनता कुणाच्या पारड्यात मतदान करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच मराठवाड्यात जरांगे फॅक्टर तर विदर्भात कुणबी आणि शेतमालाचा मुद्दा गाजला. लोकसभेत दोन्ही प्रदेशांनी महायुतीला हात दाखवला होता. आता मात्र या दोन्ही प्रदेशांनी महायुतीच्या विशेषतः भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. परळीत अंदाजाप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या घड्याळाचा गजर झाला. तर इतर मतदारसंघात पण महायुतीने मोठी आघाडी घेतली. तर महाविकास आघाडीचा धु्व्वा उडवला. राज्यात महायुतीने 225 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी 56 जागांवर गुंडाळल्या गेल्याचे दिसून येते.

मराठवाड्यात कुणाचा वरचष्मा?

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील 46 जागांवर महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. 34 जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, फुलंबी, सिल्लोड, जालना, भोकरदन, कळमनुरी, परभणी, जिंतुर, भोकर, परंडा, परळी, लातूर शहर, लातूर ग्रामीण, तुळजापूर यासह अनेक ठिकाणी अटी-तटीची लढत होण्याचा अंदाज लावण्यात आला होता. पण काही जागा वगळता इतर ठिकाणी महायुतीची लीड तुटली नाही. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कायम चर्चेत राहिला.

परळी – परळी विधानसभा मतदारसंघात सध्या 26 पैकी 11 फेऱ्या झाल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी पवार गटाचे धनंजय मुंडे यांना 83,411 मते मिळाली आहेत. तर शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना 20 हजारांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

औरंगाबाद पूर्व – औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात अतुल सावे सध्या पराभवाच्या छायेत आहेत. याठिकाणी एमआयएमचे उमेदवार आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना 75,232 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे अतुल सावे यांना 46,623 मते मिळाली आहेत. आता मत मोजणीच्या 24 पैकी 15 फेऱ्या झाल्या आहेत.

सिल्लोड – सिल्लोडमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. मतमोजणीच्या 29 पैकी 14 फेऱ्या झाल्या आहेत. याठिकाणी शिंदे सेनेचे अब्दुल सत्तार यांना 65,178 मते मिळाली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे सुरेश बनकर यांना 62,517 मिळाली आहेत. केवळ दोन हजारांच्या मतांचा फरक आहे.

भोकरदन – भोकरदन विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी मोठी काळजी घेतली. त्याचा परिणाम दिसून आला. याठिकाणी मतमोजणीच्या 24 पैकी 9 फेऱ्या पूर्ण झाल्या. त्यात संतोष दानवे यांना 50,977 जागा तर शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे यांना 39,006 मते मिळाली आहेत.

जालना – जालना विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 24 पैकी 9 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांना 41,548 तर काँग्रेसचे कैलास गोरंटयाल यांना 28,549 मते मिळाली.

घनसावंगी – या मतदारसंघात राजेश टोपे पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या 26 पैकी 10 फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यात सेनेचे हिकमत उढाण यांना 42,712 इतकी मतं मिळाली आहेत. तर राजेश टोपे यांना 36,005 इतकी मतं मिळाली आहेत.

कळमनुरी – या मतदारसंघात मतमोजणीच्या 26 पैकी 14 फेऱ्यांमध्ये शिंदेसेनेचे संतोष बांगर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 73,055 मते मिळाली आहेत. तर डॉ. संतोष तारफे यांना 49,138 मते मिळाली आहेत.

भोकर – भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांना 47,952 मते मिळाली आहेत. तर विरोधातील तिरुपती कदम यांना 30,754 मतं मिळाली आहेत.

परभणी – परभणी मतदारसंघात उद्धव सेनेचे डॉ. राहुल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना 83,539 मते मिळाली आहे. तर सिंदे सेनेचे आनंद भरोसे यांना 57,418 मते मिळाली आहे. मतमोजणीच्या 25 पैकी 16 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

परंडा- या मतदार संघात सध्या काँटे की टक्कर सुरू आहे. मतमोजणीच्या 27 पैकी 13 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. शिंदे सेनेचे नेते तानाजी सावंत यांना 48,047 मतं मिळाली आहेत. तर शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना 47,267 मतं मिळाली आहेत. 780 मतांनी मोटे पिछाडीवर आहेत.

तुळजापूर- या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसून येत आहे. राणा जगजीतसिंह पाटील यांनी मोठी लीड घेतली आहे. मतमोजणीच्या 30 पैकी 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पाटील यांना 78,969 मते मिळाली आहेत. तर कुलदीप कदम पाटील यांना 57,359 मते मिळाली आहेत.

लातूर शहर – या मतदारसंघात अमित देशमुख हे सध्या आघाडीवर आहेत. त्यांना 62,065 मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या डॉ. अर्चना चाकूरकर पाटील यांना 54,670 मते मिळाली आहेत. सध्या मतमोजणीच्या 28 पैकी 15 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

लातूर ग्रामीण – या मतदारसंघात सध्या काँटे की टक्कर सुरू आहे. काँग्रेसचे धीरज देशमुख यांना 54,362 मते मिळाली आहेत. तर भाजपाचे रमेश कराड यांनी दोन हजारांची आघाडी घेतली आहे. त्यांना 56,604 मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या 26 पैकी 14 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.