AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसआयटी चौकशीच्या घोषणेनंतर मनोज जरांगे यांचे आव्हान…होऊन जाऊ द्या

मी निर्भिड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. एसआयटी चौकशी करा. पण अर्धवट चौकशी करू नका. मी परवाच यासंदर्भात बांधवांना संकेत दिले होते. मला गुंतवण्याची प्रयत्न होतोय, हे सांगितले होते.

एसआयटी चौकशीच्या घोषणेनंतर मनोज जरांगे यांचे आव्हान...होऊन जाऊ द्या
manoj jarange patil and devendra fadnavis
| Updated on: Feb 27, 2024 | 12:14 PM
Share

दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर, दि. 27 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रकरणावर एसआयटी चौकशीची घोषणा विधिमंडळात झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवर आपण ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. SIT चौकशीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, चांगले आहे. मंत्र्यांची सुद्धा चौकशी होऊ द्या. मला कोणतीही भीती नाही. पण अर्धवट चौकशी करू नका. मी परवाच यासंदर्भात बांधवांना संकेत दिले होते. मला गुंतवण्याची प्रयत्न होतोय, हे सांगितले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक

देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणत्याही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाही. मला सर्वात जास्त फोन तुमचे आले आहे. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुट्टी नाही. ६०० अधिकारी जातील. ज्या मंत्र्यांने आदेश दिले ते जातील.

त्यामुळे मी म्हणालो होतो, मीच तुझ्या घरी येतो….

देवेंद्र फडणवीस यांच्यांकडून षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे मीच त्यांच्या घरी जाणार होतो. आता संपूर्ण समाज त्यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे. आम्ही आधी 50 वर्षे तुम्हालाच मोठे करण्यात घालवली ना. मी निर्भिड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही.

दगडफेक तुम्हीच करायला लावली

दगडफेक हे त्याचे कामच आहे. जे आरोप करत आहेत त्यांनीच दगडफेक करण्यासाठी पाठवले आहे. गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ काढत होते. ती शूटिंग पण आणा, हे पण मी सांगतो. त्या ठिकाणी हजार जण आले आणि हाणायला सुरू केली. मला अटक केली तरी मी तयार आहे. मी फाशीवर जायला भीत नाही. जातीसाठी मरण येईल. फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.