मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? जनतेतून आवाज आला….

OBC Reservation | जालन्यात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एल्गार सभा झाली. या सभेत कोणावर वैयक्तीक टीका करायची नाही, असे ठरले होते. यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण आहेत? याचे उत्तर जनतेतून घेतले. जनतेने शरद पवार यांचे नाव घेतले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू कोण? जनतेतून आवाज आला....
gopichand padalkarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 2:19 PM

सागर सुरवसे, जालना | 17 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरु आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्र आले. त्यांनी जालन्यातील अंबड येथे सभा घेतली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळवकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मराठा समाजाचे खरे शत्रू कोण आहे? याचे उत्तर दिले. हे उत्तर स्वत: दिले नाही. त्यांनी जनतेतून ते उत्तर घेतले. जनतेने मराठा समाजाचे खरे शत्रू शरद पवार असल्याचे वक्तव्य केले. आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीशी सगळे आहोत, असे त्यांनी म्हटले. ‘प्रस्थापिताना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर’, असा नवीन नारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.

३४६ जातींच्या आरक्षणाला हात लावू नका

ओबीसींची ही सभा पाहून ओबीसीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु ओबीसीमधील ३४६ जातींचे आरक्षणाला हात लावता काम नये, असे स्पष्टपणे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

38 भटक्या जाती ओबीसीत

महाराष्ट्रात 38 भटक्या जाती ओबीसीतल्या आहेत. माळी, धनगर, वंजारी समाजाने या भटक्या लोकांना सोबत घ्यावे. आपण ओबीसी संघटना बांधावी आणि न्याय द्यावा. अनेक जातीत विभागलेले वाघाचे बछडे एकत्र आलेत. महाराष्ट्रातील ओबीसीचा ढाण्या वाघ म्हणजे भुजबळ साहेब आहेत. त्यांनी भटक्या जमातींना ऊर्जा देण्याचं काम केलं. वाघ म्हातारा झाला म्हणजे तो डरकाळी फोडायचा राहत नाही. सिंह म्हातारा झाल्यावर गवत खात नाही, या शब्दांत त्यांनी भुजबळ यांचे कौतूक केले.

हे सुद्धा वाचा

दिला नवीन नारा

गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण 346 जातींचा ओबीसी समाजाला धक्का लावू नये. ओबीसीवर अन्याय झाल तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. “प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर”, हा नारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.

Non Stop LIVE Update
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.