
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. लाल ड्रेसमध्ये अभिनेत्री राजकुमारी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आता अभिनेत्रीचे फोटो अबू जानी संदीप खोसला यांनी पोस्ट केले आहे. तमन्ना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तिचा फॅशन सेन्स देखील अनेकांना आवडतो.

तमन्ना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तमन्ना अभिनेता विजय वर्मा याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील केलं जातं.

तमन्ना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखी फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.