AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Jal Akrosh Morcha : भाजपच्या ‘जल आक्रोश मोर्चा’चा बॅनर अज्ञातांनी फाडला, औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आक्रमक

भाजपचा पाडेगाव परिसरातील जल आक्रोश मोर्चासाठी लावण्यात आल्याचा बॅनर अज्ञातांनी फाडला आहे. बॅनर फाडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रम झाले आहेत. मोर्चाच्या एक दिवस आधी बॅनर फाडल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

BJP Jal Akrosh Morcha : भाजपच्या 'जल आक्रोश मोर्चा'चा बॅनर अज्ञातांनी फाडला, औरंगाबादेत भाजप कार्यकर्ते आक्रमक
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 11:02 PM
Share

औरंगाबाद : शहरात पाण्याचा प्रश्न (Water Crisis) अधिकच गंभीर बनला आहे. पाण्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवार (23 मे) रोजी भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यावरुन आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशावेळी शहरात भाजपकडून मोर्चासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र, भाजपचा पाडेगाव परिसरातील जल आक्रोश मोर्चासाठी लावण्यात आल्याचा बॅनर (Banner) अज्ञातांनी फाडला आहे. बॅनर फाडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रम झाले आहेत. मोर्चाच्या एक दिवस आधी बॅनर फाडल्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत खैरेंची फडणवीसांवर टीका

भाजपच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी भाजपचा खोडसाळपणा सुरु आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीस मोर्चा काढत आहेत. औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा भाजपचे लोक मुद्दाम विस्कळीत करत आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय.

पोलिसांकडून मोर्चाला परवानगी, 14 अटींची लिस्ट

  1. कोणत्याही परिस्थिती मार्गात बदल नको
  2. मोर्चात सहभागी होण्याऱ्यांनी शिस्त पाळावी
  3. मोर्चा दरम्यान कोणतेही शस्त्र, स्फोटक पदार्थ सोबत ठेवू नयेत
  4. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची जबाबदारी संजोयकांची राहील
  5. मोर्चात स्वयंसेवक नेमण्यात यावेत, त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, येणाऱ्यांची संख्या, लोकांची माहिती द्यावी
  6. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करू नका
  7. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचा पोलिसांना अधिकार राहणार
  8. मोर्चात कोणात्याही प्रकराचे वंश, जात, धर्म, प्रदेश यांचा अपमान होईल असे वक्तव्य करू नये
  9. मोर्चा दरम्यान ध्वनिक्षेपकांचा वापर करताना कायदाचा भंग करु नये
  10. मोर्चा दरम्यान अत्याश्यक सुविधांना बांधा होणार नाही याची काळजी घ्यावी
  11. वाहतूक विभागाकडून काढलेली नियमवाली मोर्चेकऱ्यांसाठी बंधनकारक
  12. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची सोय करावी
  13. मोर्चात वापरण्यात येणाऱ्या विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, ध्वनीपेक्षक व्यवस्थीत असल्याची खात्री करा
  14. अटी आणि शर्तीचे उल्लघंन केल्यास कारवाई केली जाणार

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...