Vastu Tips | नोकरी प्रगती हवीये, व्यवसायात दुप्पट नफा कमवायचाय, मग हे सोपे उपाय करुन पाहा

नोकरी, व्यवसायात प्रत्येकालाच अपयश किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा असे देखील होते की, प्रयत्न करुनही निराशाच पदरी पडते. याशिवाय, अनेकवेळा नोकरीतही अनेक अडचणी येतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राचे हे उपाय केवळ व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीचे दरवाजे उघडत नाहीत तर उत्पन्न दुप्पट करण्यासही मदत करतात -

Vastu Tips | नोकरी प्रगती हवीये, व्यवसायात दुप्पट नफा कमवायचाय, मग हे सोपे उपाय करुन पाहा
VASTU
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 6:30 AM

मुंबई : नोकरी, व्यवसायात प्रत्येकालाच अपयश किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा असे देखील होते की, प्रयत्न करुनही निराशाच पदरी पडते. याशिवाय, अनेकवेळा नोकरीतही अनेक अडचणी येतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राचे हे उपाय केवळ व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीचे दरवाजे उघडत नाहीत तर उत्पन्न दुप्पट करण्यासही मदत करतात –

? नोकरीसाठी वास्तु उपाय – 

? नोकरीला जाण्यापूर्वी पांढऱ्या गाईला गूळ आणि चपाती मिसळून खाऊ घाला. तसेच काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यानंतरच नोकरीसाठी बाहेर जा.

? कामात काही अडथळे येत असतील तर गोड खाऊन घराबाहेर पडावे. जर खाणे शक्य नसेल तर ते सोबत घेऊन बाहेर पडा.

? कामाच्या ठिकाणी महालक्ष्मी यंत्र लावावे. तसेच, शुक्रवारी स्फटिकाची माळ घालून नोकरीला जा. त्यामुळे नोकरीत उत्पन्नाचा मार्ग मोकळा होईल.

? नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कामाच्या ठिकाणी गणपतीचे चित्र लावा. चित्रात गणेशाची सोंड उजवीकडे असावी.

? पक्ष्यांना रोज सात प्रकारचे धान्य खाऊ घातल्याने नोकरीतील उत्पन्न दुप्पट होते.

? व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी हे उपाय करा –

? व्यवसायात यश मिळवण्यासाठी कंपनी किंवा दुकानाचे नाव लाल रंगाने लिहा. यासाठी दक्षिण दिशेचा वापर करणे फायदेशीर ठरेल.

? व्यवसायाच्या ठिकाणी दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात बसावे. वास्तूनुसार हा कोन मालकासाठी शुभ मानला जातो.

? व्यवसायाच्या ठिकाणी ईशान्येकडे तोंड करुन बसणेही खूप शुभ असते. असे बसल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. त्याचबरोबर संपत्तीतही वाढ होते.

? ऑफिसमध्ये कपाट किंवा कोणत्याही प्रकारचे फर्निचर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे वास्तूच्या दृष्टीने चांगले आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी