Fact Check : सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी फ्री रिचार्जची ऑफर, मेसेजमधील दावा खरा की खोटा?

| Updated on: Apr 22, 2021 | 3:46 PM

ग्राहकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा किंवा इतर माहितीची चोरी होऊ शकते. (Fact Check free recharge plans for online education)

Fact Check : सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी फ्री रिचार्जची ऑफर, मेसेजमधील दावा खरा की खोटा?
mobile
Follow us on

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांच्या संघटनेच्या सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) ने सर्वसामान्य लोकांनी फेक मेसेजला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी (Online Education) 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज दिला जात (Free Recharge Plans) आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे. या बनावट मेसेजमुळे लोकांची दिशाभूल केली जात आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याचे समोर आलं आहे. (Fact Check Viral Message free recharge plans for online education)

COAI ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा किंवा इतर माहितीची चोरी होऊ शकते. तसेच याचे गंभीर परिणामांना ग्राहकांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा सीओएआयने दिला आहे.

मेसेजमधील दावा काय?

सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज दिला जात आहे. यात रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एयरटेल (Bharti Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) या ग्राहकांचा हा रिचार्ज देण्यात येणार आहे, असा दावा यात करण्यात येत आहे.

मेसेजमधील दावा खरा की खोटा?

COAI ने दिलेल्या माहितीनुसार कोणीही या मेसेजमधील URL वर क्लिक करु नका. तसेच अशाप्रकारच्या फेक मेसेजपासून सावध राहा. सरकार किंवा टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडर्सकडून अशी कोणतीही योजना दिली जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबिय आणि मित्रांना सतर्क करा, असे COAI ने म्हटलं आहे.

अनेक ग्राहक अशाप्रकारचे फ्रीमध्ये मिळणाऱ्या एखाद्या मेसेजच्या लिंकवर क्लिक करतात. मात्र ग्राहकांनी या लिंकवर क्लिक करु नये, असा सल्ला COAI ने दिला आहे.

तसेच जर तुम्हाला अशाप्रकारचा मेसेज आला, तर तुम्ही तो तात्काळ डिलीट करावा. तसेच तो कोणालाही फॉरवर्ड करु नये. यामुळे आपण याविरोधात एकत्र लढू शकतो. तसेच इतरांची फसणूक होण्यापासून वाचवू शकतो. त्याशिवाय जर तुम्हाला अशाप्रकारचा मेसेज मिळाला तर तुम्ही त्यावर क्लिक करु नका. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा किंवा माहिती चोरी होऊ शकते. (Fact Check Viral Message free recharge plans for online education)

संबंधित बातम्या : 

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर…

खासगीकरण झालेल्या ‘या’ बँकेत 100 रुपयात खातं उघडा, पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार सुविधा

कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअर काय असतो? Credit आणि CIBIL मध्ये फरक काय?