नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा;  40 टक्के पेट्रोलपंप बंद

नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा; 40 टक्के पेट्रोलपंप बंद

| Updated on: Jun 17, 2022 | 9:56 AM

सध्या नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. तेल कंपन्यांकडून पेट्रोलपंपांना इंधनाचा कमी पुरवठा झाल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे.

नागपूरकरांना सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. जवळपास 40 टक्के पेट्रोलपंपांवर इंधनाचा खडखडाट आहे. तेल कंपन्यांकडून पेट्रोलपंपांना कमी इंधनाचा पुरवठा झाल्याने नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. अनेक पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने पेट्रोलसाठी वनवन फिरण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.

Published on: Jun 17, 2022 09:56 AM