Car : एकदा फीचर्स बघाल तर ‘या’ कारच्या प्रेमातच पडाल… केवळ 50 हजारांत बुक करण्याची संधी…

| Updated on: Jul 19, 2022 | 4:27 PM

टक्सन न्यू जेन ह्युंदाईची पहिली कार आहे, ज्यात ADAS टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. अपकमिंग एसयुव्हीला 2.0 लीटर पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 2.0 लीटर डिझेल इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत सादर केले जाण्याची शक्यता आहे.

Car : एकदा फीचर्स बघाल तर ‘या’ कारच्या प्रेमातच पडाल... केवळ 50 हजारांत बुक करण्याची संधी...
Hyundai Car
Follow us on

मुंबई : ह्युंदाईने (Hyundai) नुकतेच भारतात टक्सन एसयुव्हीचे चौथे जनरेशन व्हर्जन ग्राहकांच्या भेटीसाठी आणले आहे. ह्युंदाई अपकमिंग टक्सनला 4 ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. लाँचच्या आधी कंपनीने या एसयुव्हीच्या प्री-बुकिंगला सुरुवात केली आहे. देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या ह्युंदाई सिग्नेचर आउटलेट्‌समध्ये 50 हजार रुपये देत कारचे प्री-बुकिंग (pre-booking) करता येणार आहे. या शिवाय ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर देखील नवीन टक्सनला बूक करुन शकणार आहेत. न्यू जेन टक्सन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्यात, प्लॅटिनम आणि सिग्नेचर व्हेरिएंटचा सहभाग आहे. ह्युंदाईच्या फ्लॅगशिप एसयुव्हीला आपल्या सेंसुअल स्पोर्टीनेस डिझाईनसह तयार करण्यात आले आहे. टक्सनचे (Tucson) हे न्यू जेन मॉडेल आइकॉनिक डिझाईन, प्रीमिअम कंफर्ट आणि कन्वेनिएंस, लेवल नेक्स्ट सेफ्टी, डॉमिनेंट परफॉर्मेंस आणि ॲडव्हांस इंफोटेनमेंट ॲंड कनेक्टिव्हिटी या पाच गोष्टींवर आधारीत आहे. ह्युंदाई टक्सन ऑनलाइन कशी बुक करावी लागणार आहे.

अशी करा बुकींग

1) ह्युंदाईच्या क्लिकटूबाय वेबसाईटला भेट द्यावी.

2) ऑनलाईन बुकिंगचा पर्याय दिसेल, त्याला निवडावे.

हे सुद्धा वाचा

3) आता न्यू. टक्सन कारच्या फोटोवर क्लिक करा.

4) मॉडेल पर्यायावर ऑटोमॅटिक न्यू टक्सन पर्याय येईल.

5) त्याच्या बरोबर खाली फ्यूअल टाइप डिझेल किंवा पेट्रोलमधून एकाची निवड करा.

6) आपल्या आवडीचे व्हेरिएंट निवडा

7) व्हेरिएंट निवडल्यानंतर कारचे एक्स्टीरियर म्हणजेच बाहेरील कलर निवडा.

8) एक्सटीरियर कलर निवडल्यानंतर राज्य आणि शहराची निवड करा.

9) आपल्या शहरातील डिलर्सची लिस्टमधील एक डिलरला निवडावे.

10) आता प्री-बुकिंगसाठी 50 हजार रुपयांचे पेमेंट करुन बुकिंग फाइनल करावी.

काय आहेत फीचर्स?

ह्युंदाई टक्सन न्यू जेनला अनेक लोकप्रिय फीचर्ससोबत सादर केले जाणार आहे. टक्सनच्या नवीन मॉडेलमध्ये बोस प्रीमिअम साउंड 8 स्पीकर सिस्टीम, हाइट ॲडजस्टमेंटसह हेंड्‌स फ्री स्मार्ट पावर टेल गेट, ड्राइवर पावर सीट मेमोरी फंक्शन, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, रेन सेंसिंग वाइपर्स, स्मार्ट की सोबत रिमोट इंजिन स्टार्ट सारखे कूल फीचर्सही मिळणार आहेत.

ह्युंदाई टक्सन 2022 चे स्पेसिफिकेशन्स

टक्सन न्यू जेन ह्युंदाईची पहिली कार आहे, ज्यात ADAS टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. अपकमिंग एसयुव्हीला
2.0 लीटर पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 2.0 लीटर डिझेल इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत सादर केले जाण्याची शक्यता आहे.