कोरोना लसीकरणातही रिलायन्सचा वरचष्मा; 98 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

Covid Vaccine | रिलायन्स केअरच्या 'वी केअर' अभियानातंर्गत 10 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नीता अंबानी यांनी आमची कंपनी सामान्य लोकांच्या लसीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

कोरोना लसीकरणातही रिलायन्सचा वरचष्मा; 98 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
मुकेश अंबानी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 27, 2021 | 12:30 PM

मुंबई: देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीने घेतलेला प्रत्येक निर्णय आणि कृती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये रिलायन्सची गुंतवणूक आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनी सातत्याने चर्चेत असते. आतादेखील आणखी एका कारणामुळे रिलायन्स कंपनी प्रकाशझोतात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रिलायन्सने एप्रिल महिन्यापासून आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली. मिशन व्हॅक्सीन सुरक्षा या अभियानातंर्गत आतापर्यंत रिलायन्सच्या 10 लाख कर्मचाऱ्यांना कोरोना लस मिळाली आहे. 98 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाचा किमान एक डोस घेतला आहे. यामध्ये रिलायन्स कंपनी, भागीदार सदस्य, त्यांचे कुटुंबीय, कंत्राटी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

याशिवाय, रिलायन्स केअरच्या ‘वी केअर’ अभियानातंर्गत 10 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नीता अंबानी यांनी आमची कंपनी सामान्य लोकांच्या लसीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 10 हजारांनी घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 10 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात 29 हजार 689 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तब्बल 132 दिवसांनी नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 30 हजारांच्या खाली गेला आहे. त्यासोबतच अॅक्टिव्ह केसेसही चार लाखांच्या खाली आल्या आहेत. कालच्या दिवसात 415 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 415 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 363 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

राज्यात एक कोटी लसवंत

कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना बाहेर फिरण्याची परवानगी मिळणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें