Urfi Javed : उर्फी जावेदची अश्लील शायरी, चित्रा वाघ यांना डिवचण्याच्या नादात हे काय म्हणाली?

उर्फीच्या या शायरीने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी या शायरीवरून उर्फीला झापले आहेच. मात्र, उर्फी आणि चित्रा ताईच्या वादात नेटकरी उर्फीची बाजू घेताना दिसत आहेत.

Urfi Javed : उर्फी जावेदची अश्लील शायरी, चित्रा वाघ यांना डिवचण्याच्या नादात हे काय म्हणाली?
Urfi Javed
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 11, 2023 | 7:04 AM

मुंबई: मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील कलगीतुरा अजूनही थांबलेला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून या दोघींमध्ये कलगीतुरा रंगला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून हा वाद सुरू झाला होता. मात्र, आता चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना उर्फीचा तोल घसरला आहे. तो इतका की उर्फीने थेट अश्लील शायरीच केली आहे. चित्रा वाघ यांच्यावर शायरीतून टीका करताना आपण अश्लील शायरी केलीय हे सुद्धा उर्फीच्या ध्यानात आलेलं नाहीये. तिच्या या अश्लील शायरीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्यावर अश्लील शायरी केल्याने टीकाही झाली. पण उर्फीला त्याचं काहीच पडलेलं नसल्याचं दिसून येत आहे.

 

चित्रा वाघ यांनी टीका केल्यापासून उर्फी जावेदनेही त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. चित्रा वाघ कधी ट्विटर तर कधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उर्फीवर टीका करत आहेत. तर उर्फी केवळ ट्विटरच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. उर्फी अधूनमधून शायरीच्या माध्यमातूनही चित्रा वाघ यांच्यावर टीका करत आहे. मात्र, यावेळी शायरीतून टीका करताना तिचा तोल घसरला. तिने शायरी केली. पण आपण अश्लील शायरी केली हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं नाहीये.

उर्फीने स्वत:ही शायरी लिहिली आहे. तिने ट ला ट करण्याच्या नादात अश्लील शायरी केली आहे. हिंदीतून तिने ही शायरी केली आहे. ‘उर्फी के अंडरवियर में छेद है, चित्रा ताई ग्रेट है…’ असं तिने म्हटलं आहे.

उर्फीच्या या शायरीने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी या शायरीवरून उर्फीला झापले आहेच. मात्र, उर्फी आणि चित्रा ताईच्या वादात नेटकरी उर्फीची बाजू घेताना दिसत आहेत. उलट चित्रा वाघ यांच्याविरोधात नेटकऱ्यांनी अधिक कमेंट केल्या आहेत.

काहींना खट्याळ सासू, नाठाळ सून या सिनेमाचं पोस्टर पोस्ट केलं आहे. त्यात चित्रा वाघ आणि उर्फीचा फोटो दाखवला आहे. एकाने तर सासू नंबरी, सून दस नंबरी असं लिहिलेलं पोस्टर व्हायरल केलं आहे. त्यावर चित्रा वाघ आणि उर्फीचा फोटो आहे. एकाने तर मटकीला मोड नाही, उर्फीला तोड नाही, असं म्हटलं आहे.