जग हादरलं! ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचे थेट पाकिस्तान कनेक्शन, दोन्ही दहशतवादी पाक..

Australia terrorist attack : ऑस्टेलियात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्लयात एक दहशतवादी ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. तिसरा फरार आहे. आता या दहशतवादी हल्ल्याबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

जग हादरलं! ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचे थेट पाकिस्तान कनेक्शन, दोन्ही दहशतवादी पाक..
Australia terrorist attack
| Updated on: Dec 15, 2025 | 8:12 AM

ऑस्ट्रेलियातील बाँडी बीच येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 10 वर्षीय मुलीसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची अनेक व्हिडीओ पुढे येत आहेत. एक धार्मिक कार्यक्रम सुरू असताना हा गोळीबार करण्यात आला. एका व्यक्तीने धाडस दाखवत हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याला पकडून त्याच्या हातातील बंदूक घेतली आणि त्याच्यावरच गोळ्या झाडल्या. या व्यक्तीने दाखवलेल्या धाडसामुळे त्याचे काैतुक होत आहे आणि त्याच्यामुळे असंख्य लोकांचे जीव वाचले. या हल्ल्याचे थेट पाकिस्तान कनेक्शन पुढे आले. पोलीस आयुक्त मॅल लॅनियन यांनी सांगितले आहे की, दोन्ही हल्लेखोर वडील आणि मुलगा होते. वडिलांचे वय 50 वर्षे आणि मुलाचे वय 24 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अजून एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. 24 वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. ऑस्टेलियात हल्ला करणाऱ्या बाप लेकाचे नाव साजिद (वय 50) आणि नवीद अकरम (वय 24) आहे. दहशतवादी साजिद याला एका स्थानिक व्यक्तीने पकडले आणि त्याच्या हातातील बंदूक हिसकावून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दुसऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ऑस्टेलियातील हल्ल्यातील तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरक्षा यंत्रणांकडून घेतला जात आहे.

साजिद अकरम याचा फळांचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोरांनी त्यांच्या कुटुंबियांना ते फिरण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. हा हल्ला यहूदियोंच्या कार्यक्रमावेळी झाला. दहशतवादी हल्ला म्हणून या हल्लाची घोषणा करण्यात आली. हमला करणारे नवीद आणि साजिद हे दोन्ही पाकिस्तानी नागरिक आहेत. या घटनेनंतर सिडनी पश्चिमी उपनगर बॉनिरिगमध्ये पोलिसांनी छापेमारी केली.

या दहशतवादी हल्ल्यानंतर नवीदच्या आईने मीडियासमोर येऊन सांगितले की, माझा मुलगा चांगला होता फक्त तो नशा करत होता. तपासात माहिती मिळाली की, नवीन हा ऑस्टेलियातील एका इस्लामिक सेंटरमध्ये अभ्यास करायचा. आता तपास यंत्रणांकडून माहिती काढली जात आहे की, तो नेमक्या कोणत्या दहशतवादी संघटनेशी सोडला होता. इराण आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे कनेक्शन जोडले जात आहे. भारताने या दहशतवादी हलल्याची निंदा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या वाईट काळात आम्ही ऑस्टेलियाच्या सरकारसोबत खंबीरपणे उभे आहोत.