AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tahawwur Rana : वडलांच्या हट्टापायी बनला डॉक्टर, पण काम कसायाचं.. दहशतवादी तहव्वुर राणाची कुंडली वाचली का ?

Tahawwur Rana News: 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याने संपूर्ण देशच हादरला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि आरोपी तहव्वूर हुसेन राणा हा थोड्याच वेळात भारतात येणार आहे. अत्यंत क्रूर दहशतवादी असलेला राणा हा मूळचा एक पाकिस्तानी डॉक्टर आहे. त्याने पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन म्हणून काम केले होते. एक डॉक्टर ते कुख्यात दहशतवादी, कसा झाला हा धक्कादायक प्रवास ?

Tahawwur Rana : वडलांच्या हट्टापायी बनला डॉक्टर, पण काम कसायाचं.. दहशतवादी तहव्वुर राणाची कुंडली वाचली का ?
तहव्वुर राणाची कुंडी वाचली का ? Image Credit source: social media
Updated on: Apr 10, 2025 | 2:12 PM
Share

Tahawwur Rana News : संपूर्ण देशासह जगालाही हादरवणाऱ्या 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराधांचे प्राण गेले. या हल्ल्याच्या जखमा आजही भारतीयांच्या मनावर ताज्या आहेत. याच हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि आरोपी तहव्वूर हुसैन राणा अखेर आज भारतात येत आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला राणा एक डॉक्टर आहे. पण लोकांचा इलाज करता-करता तो पाकिस्तानी सेनेचा हिस्सा कसा बनला आणि नंतर कॅनडाला पोहोचला, सर्वात शेवटी तो अमेरिकन पोलिसांच्या तावडीत कसा सापडला, ही संपूर्ण कहाणी अतिशय रोचक आहे. 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात राणाचे नाव 2011 साली डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी म्हणून पुढे आले. डेन्मार्कवर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली. या हल्ल्यांमध्ये राणाची भूमिका कशी होती, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. चला, त्याची संपूर्ण कुंडली जाणून घेऊया

वडिलांचा हट्ट

तहव्वुर राणा डॉक्टर होता पण तो कसाई म्हणून काम करायचा. तो पाकिस्तानी नागरिक असून धर्मांधता आणि लोभात इतका अडकला की आता तो आपले संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवेल. भारतीय तपास संस्था एनआयएने मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणाशी चर्चा केली होती. अमेरिकेतील तुरुंगातही त्याची चौकशी करण्यात आली, पण ती मर्यादित होती. राणाचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात झाल्याचे या चौकशीदरम्यान,उघड झाले. लहानपणापासूनच राणाला सुरक्षा सेवेत सामील व्हायचे होते पण वडिलांच्या आग्रहामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आणि पाकिस्तानी सैन्याच्या मेडिकल कॉर्प्समध्ये सामील झाला.

ISIने नोकरी सोडायला लावली आणि कॅनडाला पाठवले

आपल्या सेवेदरम्यान, तहव्वूर राणाने वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित केला. त्याची वैद्यकीय पदवी पाहून, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने त्याचा इतरत्र वापर करण्याचा निर्णय घेतला, म्हणून राणा 1998 मध्ये सैन्यातील नोकरी सोडून कॅनडाला गेला.

हेडलीसाठी करू लागला काम

कॅनडामधील वास्तव्य असलं तरीही त्याचदरम्यान, तहव्वूर राणा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सतत संपर्कात होता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने तेथे इमिग्रेशन सेवा देण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. डॉक्टर असल्याने त्याला कॅनडाचे नागरिकत्वही मिळाले. कॅनडामधील अनेक लोकांशी संपर्क साधल्यानंतर, राणाने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडे अमेरिकेत जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर त्याला शिकागोला पाठवण्यात आले आणि त्याने शिकागोमध्ये आपले ऑफीसदेखील स्थापन केलं. इथेच त्याची भेट (मुंबई हल्ला) या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी डेव्हिड हेडलीशी झाली. डेव्हिड हेडली देखील अमेरिकन नागरिक आहे.

पत्नीसोबत भारतात आला

तहव्वूर राणा हा नावाने डॉक्टर होता पण त्याच्यात डॉक्टरसारखी माणूसकी बिलकूल नव्हती, त्याची सर्व कामं ही कसायासारखीच होती. डॉक्टरकी करण्यापेक्षा विध्वंस आणि कट्टरतावादावर त्याचं जास्त लक्ष होतं. एवढंच नव्हे तर त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य अतिशय विलासी पद्धतीने, आलिशान तऱ्हेने जगायचं होतं आणि त्यासाठीच तो सतत पैसे गोळा करत राहिला. राणा हा त्याची पत्नी सम्राज राणा अख्तरसोबत भारत दौऱ्यावरही आला होता. त्याने दिल्ली व्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईला भेट दिली होती. जर राणा डॉक्टर म्हणून आयुष्य जगला असता तर तो एक उत्तम आयुष्य जगू शकला असता पण त्याच्या कट्टरतेने आणि लोभाने त्याला बुडवले आणि आता त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागण्याचीच शक्यता आहे.

200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं.
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका
देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका.
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?.
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले
काय दुर्दैव शेतकऱ्यांचं...कोकाटेंच्या त्या व्हिडीओवरुन बच्चू कडू भडकले.
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?
कृषीमंत्र्यांचा सभागृहात रंगला रमीचा डाव; रोहित पवारांचा दावा तरी काय?.
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?
फडणवीसांना फटकारे, राज ठाकरेंचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं इंजिन?.
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार
ठाकरेंनी भाजपला डिवचलं तर हिरव्या सापांच्या मागे... म्हणत पलटवार.
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्...
8० वर्षांच्या पळडकर आजीची 17 एकर जमीन कुणी लाटली?अंगठ्यांचे ठसे अन्....
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून...
तुम्ही गुगल पे, फोनपे वापरताय? तुमच्यासाठी मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून....
राज ठाकरेंना अटक करा, सामान्य माणूस असुरक्षित अन्... सदावर्तेंची टीका
राज ठाकरेंना अटक करा, सामान्य माणूस असुरक्षित अन्... सदावर्तेंची टीका.