धडकी भरवणारे आकडे! राज्यात 63,294 नवे रुग्ण सापडले, 349 कोरोना बाधितांचा मृत्यू

आज राज्यात कधी नव्हे ते 63,294 नव्या रुग्णांचे निदान झालेय. तर महाराष्ट्रात 349 कोरोना बाधितांच्या मृत्यूचीही नोंद झालीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:53 PM, 11 Apr 2021
धडकी भरवणारे आकडे! राज्यात 63,294 नवे रुग्ण सापडले, 349 कोरोना बाधितांचा मृत्यू
corona virus news

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात कधी नव्हे ते 63,294 नव्या रुग्णांचे निदान झालेय. तर महाराष्ट्रात 349 कोरोना बाधितांच्या मृत्यूचीही नोंद झालीय. (Shocking figures! 63,294 new patients were found in the maharashtra, 349 corona infected died)

सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.7 टक्के एवढा

सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.7 टक्के एवढा आहे. राज्यात 63,294 नवे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5,65,587 एवढी झालीय. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण 34, 07, 245 झालीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे आणि औरंगाबाद, नागपूर यांसारख्या जिल्ह्यांतील परिस्थिती बिघडलीय. अनेक रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी बेडच मिळत नाहीयेत. तर अनेक रुग्णांना रेमडेमीसीव्हर इंजेक्शनची कमतरता भासतेय. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमधल्या स्मशानभूमीत रुग्णांना अग्नी देण्यासाठी रांगा लागण्याचं चित्र निर्माण झालंय.

8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा, मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज टास्क फोर्सची बैठकही घेतलीय. या बैठकीत 8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. तर टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन पाहिजे, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकते, असं मत मांडलंय. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत लॉकाडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय

मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सच्या घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होते. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी गरज असेल तिथे व्यवस्था, वरळी, कांजूरसह अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरसह, ICU बेडची सोय

Sharad Pawar health update : अवघ्या काही दिवसांच्या आत शरद पवार दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्या सर्जरी होणार

Shocking figures! 63,294 new patients were found in the maharashtra, 349 corona infected died