Mock Drill : देशातल्या कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रीलचे आदेश, त्यात महाराष्ट्र आहे का?

Mock Drill : भारत सरकारने पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी 244 जिल्ह्यात मॉक ड्रील आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या ड्रीलचा उद्देश नागरिकांना आपातकालीन स्थितीसाठी प्रशिक्षित करणं हा आहे. ड्रीलमध्ये नागरिकांना काय ट्रेनिंग दिली जाणार? 1971 नंतर देशात प्रथमच अशी मोठी नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल होत आहे.

Mock Drill : देशातल्या कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रीलचे आदेश, त्यात महाराष्ट्र आहे का?
Mock Drill
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: May 06, 2025 | 10:15 AM

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मॉक ड्रील करण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, उद्या 7 मे रोजी ही मॉकड्रील होणार आहे. या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा, ते ट्रेनिंग दिलं जाईल. सिविल डिफेंस म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रीलमागे उद्देश आहे. देशात शेवटची मॉक ड्रील 1971 साली झाली होती.

ही मॉक ड्रील 244 सिविल डिफेंस डिस्ट्रिक्टमध्ये (नागरिक सुरक्षा जिल्हा) होणार आहे. सिविल डिफेंस कायदा 1968 संपूर्ण देशात लागू आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या 244 जिल्ह्यात मॉक ड्रीलची योजना आहे. हे जिल्हे भारत-पाकिस्तान सीमेशी जोडलेले आहेत. यात जम्मू कश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात. या राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत. त्या शिवाय अशीही काही संवेदनशील शहरं आहेत, ज्यांना सिविल डिफेंस डिस्ट्रिक्टमध्ये परावर्तित करण्यात आलं आहे.

सिविल डिफेंस ऑर्गनायजेशनची भूमिका महत्त्वाची

नागरिक सुरक्षेचा उद्देश जीवन वाचवणं, संपत्तीची हानी कमी करणं, उत्पादन कायम सुरु ठेवणं आणि लोकांच मनोबल कायम ठेवणं हा आहे. युद्ध आणि आपातकालच्यावेळी सिविल डिफेंस ऑर्गनायजेशनची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यात ते आंतरिक क्षेत्रांच रक्षण करतात. सशस्त्र यंत्रणांना मदत करतात. नागरिकांना संघटित करतात.

सायरन वाजल्यावर काय करालं?

तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जालं.

5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.

सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.

फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.

घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा.

टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.

अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.

सायरन कुठे-कुठे लागणार?

सरकारी भवन

प्रशासनिक भवन

पोलीस मुख्यालय

फायर स्टेशन

सैन्य ठिकाणं

शहरातील मोठे बाजार

गर्दीच्या जागा

सिविल मॉक ड्रिलमध्ये कोण-कोण?

जिल्हाधिकारी

स्थानीय प्रशासन

सिविल डिफेंस वार्डन

पोलिसकर्मी

होम गार्ड्स

कॉलेज-स्कूल विद्यार्थी

नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)

नॅशनल सर्विस स्कीम (NSS)

नेहरू युवा केंद्र संगठन (NYKS)