AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स सेंटरच्या कोनशिलेतून कानडी गायब; कुमारस्वामी भाजपवर भडकले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी काल शनिवारी कर्नाटकात आले आहेत. (Kumaraswamy provokes Amit Shah, says "Why should home minister reply...")

रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स सेंटरच्या कोनशिलेतून कानडी गायब; कुमारस्वामी भाजपवर भडकले
| Updated on: Jan 17, 2021 | 11:30 AM
Share

बंगळुरू: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी काल शनिवारी कर्नाटकात आले आहेत. शहा यांच्या हस्ते शनिवारी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स सेंटरची कोनशिला बसविण्यात आली. मात्र, या कोनशिलेवर केवळ हिंदी आणि इंग्रजीतूनच मजकूर लिहिलेला होता. कोनशिलेतून कानडी हद्दपार करण्यात आल्याने जनता दल संयुक्तचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी प्रचंड भडकले आहेत. (Kumaraswamy provokes Amit Shah, says “Why should home minister reply…”)

कुमारस्वामी यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी शिवमोगाच्या भद्रावती येथे आरएएफ युनिटचा शिलान्यास करण्यात आला. त्याच्या फाऊंडेशन पॅनलवर हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख आहे. यावेळी कन्नड भाषेची उपेक्षा करण्यात आली आहे. देशाने त्रिभाषा सूत्रं स्वीकारलेलं आहे. त्यामुळे संबंधित राज्याच्या भाषेचा सन्मान करणं हे केंद्राचं कर्तव्य आहे. गृहमंत्र्यांनी त्रिभाषा सूत्राची केलेली अवहेलना आणि कन्नड भाषा आणि कन्नड नागरिकांचा अपमान करणारी आहे, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी अपमान केला

ही गोष्ट कन्नड भाषिकांसाठी अत्यंत अपमानास्पद आहे. सेंटरसाठी जी जमीन दिली आहे. ती कन्नड भूमीची आहे. त्यामुळे कन्नड भाषेची उपेक्षा का करण्यात आली? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. जी व्यक्ती जमीन आणि भाषेची रक्षा करू शकत नाही, ती व्यक्ती राज्य करू शकत नाही. केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कानडी जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

अमित शहा यांनी शनिवारी शिवमोगाच्या भद्रावती येथे रॅपिड अॅक्शन फोर्स सेंटरचं भूमिपूजन केलं. यावेळी त्यांच्या हस्ते या सेंटरची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा उपस्थित होते. सेंटरचा शिलान्यास केल्यानंतर शहा यांनी आनंद व्यक्त केला होता. या सेंटरसाठी 230 कोटी रुपये खर्च होणार आहे. या सेंटरमध्ये प्रशासकीय भवन, निवास केंद्र, रुग्णालय, केंद्रीय स्कूल आणि स्टेडियम असणार आहे. (Kumaraswamy provokes Amit Shah, says “Why should home minister reply…”)

संबंधित बातम्या:

धक्कादायक! रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी; आठवलेंची टीका

आपण टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले; यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी

(Kumaraswamy provokes Amit Shah, says “Why should home minister reply…”)

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.