
नुकतंच झी मराठी वाहिनीचा 'झी मराठी अवॉर्ड 2024' सोहळा पार पडला. यंदाचा सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार 'शिवा' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिकला मिळाला.

सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी पूर्वा कौशिक भावनिक झाली. हा पुरस्कार स्विकारताना आई-बाबांची खूप आठवण येत आहे, असं पूर्वा म्हणाली. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. झी मराठीकडून पूर्वाला तिच्या आई-बाबांसोबतच्या फोटोची फ्रेम देण्यात आली.

हे सगळं खूप जास्त भारावून टाकणारं आहे. एखादी गोष्ट सातत्याने करत राहणं,आपल्या कामात सातत्य असणं हे खूप काहीं देऊन जातं आपल्याला... मी बाकी आळशी असले तरी अभिनयाला माझ्या सातत्य होतं आणि कायम असेल..., अशी पोस्ट पूर्वाने शेअर केलीय.

ह्या सतात्यामुळे शिवा ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त जवळची आणि मोठी घडली.. झी मराठी ची सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून मला सन्मान दिला... बऱ्याच गोष्टींचं चीझ झाल्यासारखं वाटतंय..., असंही पूर्वाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

झी मराठी च २५ वं वर्ष आणि त्यात माझा सहभाग असणं हीच मुळात मोठी गोष्ट आहे.. ह्या सगळ्यासाठी झी मराठी चे खूप आभार.... आणि जगदंब प्रोडक्शनचे ही खूप खूप आभार.. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालंय... हा मझ्या आयुष्यातला सगळ्यात हळवा, भारावून टाकणारा , खुश करणारा क्षण आहे... आणि मला तुम्ही हा अनुभव दिलात त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार.. मी कायम ऋणी असेन ... आणि असच सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करत राहीन...., असं पूर्वाने म्हटलं आहे.