AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आमच्या हिंदुत्वात सत्तारही आहेत, बाळासाहेबांनी मशिदींचे एफएसआय वाढवून दिले

बाळासाहेबांचे विचार हे हिंदुत्ववादी होते पण कुणाला त्रास द्यायचा हा त्यांचा उद्देश नव्हता. अनेक पदाधिकरी, कार्यकर्ते हे इतर समाजाचे राहिले आहेत. त्यामुळेच आमच्यासोबत देखील अब्दुल सत्तार सारखे नेतृत्व आहे. इतर समाजातील बांधवांचाही आदर करणे महत्वाचे आहे. सगळ्या धर्माचा आदर करीत पुढे जाणे याच शिकवणीचे पालन करीत आता मार्गक्रमण सुरु आहे.

Eknath Shinde : आमच्या हिंदुत्वात सत्तारही आहेत, बाळासाहेबांनी मशिदींचे एफएसआय वाढवून दिले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Jul 15, 2022 | 5:10 PM
Share

मुंबई : केवळ हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी तर आमदारांनी वेगळी वाट निवडली होती. मात्र, हिंदुत्व जोपासत असताना इतर समाजाबद्दल द्वेष ही भावना मुळीच नाही. असे हिंदुत्व तर (Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांना देखील मान्य नव्हते. त्यामुळेच तर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सुरु केलेल्या नव्या पर्वात अब्दुल सत्तार देखील आमच्यासोबत आहेत. हेच खरे हिंदुत्व असल्याचे म्हणत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचे कौतुक केले. तर असा मेळावा सिल्लोड येथे व्हावा हीच सत्तार यांची इच्छा होती. पण भविष्यात तो योगही घडून येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. (Hindu) हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

हेच आहे बाळासाहेबांचे हिंदुत्व

बाळासाहेबांचे विचार हे हिंदुत्ववादी होते पण कुणाला त्रास द्यायचा हा त्यांचा उद्देश नव्हता. अनेक पदाधिकरी, कार्यकर्ते हे इतर समाजाचे राहिले आहेत. त्यामुळेच आमच्यासोबत देखील अब्दुल सत्तार सारखे नेतृत्व आहे. इतर समाजातील बांधवांचाही आदर करणे महत्वाचे आहे. सगळ्या धर्माचा आदर करीत पुढे जाणे याच शिकवणीचे पालन करीत आता मार्गक्रमण सुरु आहे. त्यामुळे आपला मार्गही सुखकर होणार आहे आणि त्यामधून उद्देशही साध्य केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

युती सरकारच्या काळातच मुस्लिमांना न्याय

यापूर्वी मुस्लिम समाज बांधव हे रस्त्यावर नमाज पाडत होते. ही बाब बाळासाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास येताच त्यांना नमाज पाडण्याासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. वेळप्रसंगी मशिदींचे एफएसआय वाढवून दिले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याच विचाराने आपण मार्गक्रमण करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मेळावा अब्दुल सत्तार यांनी आयोजित केला असला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचे हिंदुत्व हेच मुद्दे शिंदे यांनी अधिरोखित केले आहेत.

सर्वसामान्यांना पटणारी भूमिका म्हणूनच जनाधार

माझ्यासह इतर आमदारांनी घेतलेली भूमिका ही सर्वांनाच पटलेली आहे. त्यामुळे अल्पावधीत सर्व नगरसेवक, आमदार, पदाधिकारी हे बरोबर येत आहेत. आम्ही गद्दार नसून सर्वसामान्य नागरिकांना आणि शिवसैनिकांना पटणारीच भूमिका घेतली आहे. याचा विसर गेल्या काही दिवसांपासून पडला होता, पण शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळेच दिवसेंदिवस जनाधार वाढत आहे. त्यामुळेच काम करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.