Eknath Shinde : सरकार धोक्यात? या प्रश्नावर रोहित पवारांचं मोठं विधान, म्हणतात…ते

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला आहेत. शिवसेना नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde : सरकार धोक्यात? या प्रश्नावर रोहित पवारांचं मोठं विधान, म्हणतात...ते
रोहित पवार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:16 PM

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या (shivsena) गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला असून, राज्यात राजकीय भूकंप वगैरे काही येणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही जोडण्याचे काम करतो मात्र काही जण तोडण्याचे काम करतात असे म्हणत त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत आहोत, ते जसे म्हणतील तसं करू असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले रोहीत पवार ?

शिवसेनेत फूट पडल्यास भाजप अविश्वासाचा ठराव आणू शकते याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही जोडण्याचे काम करतो. ते तोडण्याचे काम करतात. पाहुयात कोण जिंकतं ते. आम्ही आमच्या नेत्यांसोबत आहोत, आमचे नेते जो आदेश देतील तसं आम्ही करू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत काय म्हणाले?

एकनाथ  शिंदे काल सायंकाळापासून सुरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. हे खरे  आहे की, आमचे काही आमदार आमच्या संपर्कात नाहीत. मात्र आमचा एकनाथ शिंदे यांच्यासी संपर्क झाला आहे. राज्यात भूकंप वगैरे काही येणार नाही. मुख्यमंत्री प्रत्येक विभागाचा आढावा घेत असतात. जर त्यातून काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा शिवसेनेच्या पाठीत केला गेलेला वार आहे. शिवसेनेवर वार म्हणजेच तो म्हराष्ट्रावर वार आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.