
9 ऑगस्ट रोजा रक्षाबंधन आहे. भाऊ-बहिणींच्या प्रेमाचं प्रतिक असलेल्या या सणाला अनेक नियमही असतात. तसेच भावाला राखी बांधताना बहिण आशार्वाद देते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधना शुभ सण साजरा मानला जातो. रक्षाबंधनाचा सण हा भावाच्या बहिणीवरील प्रेम आणि संरक्षणाची प्रतिज्ञा देखीस असते. या दिवशी सूर्योदयापासूनच हा सण साजरा करण्यास सुरुवात करू शकता. त्याच वेळी, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचे काही नियम आहेत, जे पाळणे फलदायी ठरू शकते. राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात.
राखी बांधण्याचे नियम आणि योग्य दिशा जाणून घ्या
सामान्यत: राखी बांधताना आपण एकच किंवा दोन गाठ मारली जाते. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की राखी बांधताना दोन नाही तर तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. होय, राखीमध्ये तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. या तीन गाठींच्या मागे काही कारणे आहेत. जी प्रत्येकानं जाणून घेतली पाहिजेत. या प्रत्येक गाठीला काहीना काही अर्थ आहेत. जसं की पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते.
टिळा लावण्याची योग्य पद्धत देखील जाणून घेतली पाहिजे.
दरम्यान राखीची गाठच नाही तर टिळा लावण्याची योग्य पद्धत देखील जाणून घेतली पाहिजे. राखी बांधताना, अनामिका बोटाने कपाळावर टिळा लावण्याची आणि अंगठ्याने ती वर करण्याची प्रथा आहे. यानंतर, बहीण टिळ्यावर तांदळाचे दाणे लावते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्राथर्ना करते. बहीण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते जेणेकरून त्याच्या आयुष्यात गोडवा येईल. यानंतर, भाऊ बहिणीला भेटवस्तू देखील देतो.अशी ही एकंदरीत राखी बांधण्याची एक पद्धत असते.
राखी बांधण्याची योग्य दिशा: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना दिशा लक्षात ठेवणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. भावाला राखी बांधताना बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असले पाहिजे. त्याच वेळी, राखी बांधताना भावाने ईशान्य दिशेला तोंड करून बसणे शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)