
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेचं नवं पर्व सुरु झालं आहे. या पर्वात भारत आणि इंग्लंड पहिली कसोटी मालिका खेळत आहे. आतापर्यंत तीन सामन्यांचा खेळ संपला असून भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. पण मागच्या तीन सामन्यात एका गोष्टीवरून बराच वाद झाला. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटी सामन्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स चेंडूने.. कारण या चेंडूमुळे या मालिकेतील तीन सामन्यात बराच वादंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण हा चेंडू लगेच नरम पडतो. इतकंच काय तर त्याचा आकारही बदलून जातो. त्यामुळे त्याचा परिणाम खेळावर होतो. नव्या चेंडूमुळे पूर्ण सामन्याचं चित्र पालटून जातं. मागच्या तीन सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे चेंडू बदलण्याची प्रक्रिया होणारे वाद चर्चेचा विषय आहे. असं असताना ड्यूक्स चेंडूवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. असं असताना ब्रिटीश बॉल कंपनी लिमिटेडचे मालक दीपक जजोडिया यांनी सांगितलं की, ‘आम्ही हे चेंडू सोबत घेऊन जाऊ आणि चामडं विकणाऱ्यांसोबत चर्चा...