रातोरात करोडपती बनला वेटर, मिळाले 13 कोटी रूपये, तरीही करतोय हे काम

मॅकडोनल्ड्समध्ये वेटरची नोकरी करणाऱ्या एका तरूणाला तेरा कोटीहून अधिक रकमेची लॉटरी लागली, त्यानंतरही त्याने आपली जुनी नोकरी काही सोडली नाही.

रातोरात करोडपती बनला वेटर, मिळाले 13 कोटी रूपये, तरीही करतोय हे काम
WAITER
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 01, 2023 | 8:29 PM

नवी दिल्ली :  रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला अचानक लोट्टोचा जॅकपोट लॉटरी लागली. आणि तेरा कोटीहून अधिक रुपये त्याच्याजवळ आले. परंतू इतके पैसे जवळ आल्यानंतरही त्याने त्याची जुनी नोकरी काही सोडली नाही. त्याने काही दिवस मौजमजा केल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांची खूपच आठवण येत असल्याने पुन्हा आपली वेटरची नोकरी जॉईंन  केली आहे. त्यामुळे इतके पैसे आल्यानंतरही आपल्या सहकाऱ्यांची आठवण येईल म्हणून जॉब न सोडणाऱ्या या तरूणाची वाहवा होत आहे.

द सन या वृत्तपत्रानूसार युनायटेड किंगडमच्या कार्डीफ येथे राहणारा ल्यूक पिटार्ड मॅकडोनल्ड्स रेस्टॉरंटमध्ये काम करतात. त्यांना अलिकडेच 13 कोटी 18 लाखाची लॉटरी लागली. नॅशनल लॉटरी ड्राचा विनर बनल्यानंतर त्याचे नशिबच चमकले. परंतू इतकी श्रीमंती आल्यानंतरही त्याने आपली वेटरची नोकरी काही सोडली नाही.

2006 च्या या घटनेचा किस्सा सांगताना ल्यूकने म्हटले की त्यांच्या सोबत त्यांची गर्लफ्रेंड एमा कॉक्स देखील तेथे काम करीत होती. लॉटरी लागल्यानंतर त्याने गर्लफ्रेडशी लग्न केले. अडीच कोटी रुपायांची प्रोपर्टी खरेदी केली.

करोडपती बनूनही वेटरचा जॉब कायम

ल्यूक आणि त्याची पत्नी एमा लग्नानंतर परदेशात फिरायला देखील गेले. काही पैसे गुंतवले, त्यानंतर वर्षभराने ल्यूक आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. या कपलने पैशापेक्षाही जीवनात इतर गोष्ठी महत्वाच्या आहेत. करोडपती होण्यापूर्वी या वेटरचे जॉब करताना येथे अनेक मित्र झाले आहेत. पैसे आल्यानंतरही येथे काम करण्याचा आनंद काही औरच आहे. सहकारी माझ्या लग्नाला आले होते. ते माझ्या प्रत्येक सुख दु:खात सामील होत आले आहेत, त्यांना कसे मी सोडून जाऊ ? आपल्या जुन्या नोकरीवर परतण्याचा आपल्या पतीचा निर्णय योग्यच आहे असे त्याची पत्नी एमा म्हणाली. आम्ही दोघांनी येथे एकत्र काम करीत मजा केली आहे. आता ही तेथे आमचे चांगले मित्र आहे. ल्यूकला पुन्हा नोकरीवर आलेले पाहून त्याचा मॅकडोनल्ड्सचा ऑफिस मॅनेजर मात्र जाम खूष झाला आहे.