AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat | kolhapur स्वाभिमानी जनतेनं BJP च्या धर्मांध राजकारणाला नाकारलं

| Updated on: Apr 16, 2022 | 9:05 PM
Share

भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरच्या मतदारांवर ही निवडणूक लादली होती, जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपने करायला हवे होते, मात्र तसे न करता वेगवेगळे आरोप करण्यात आले. ताराराणीच्या भूमीत महिला असलेल्या जयश्री ताईंचा अपमान करण्याचे पातक भाजपने केले.

मुंबई : कोल्हापूर मधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरच्या मतदारांवर ही निवडणूक लादली होती, जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपने करायला हवे होते, मात्र तसे न करता वेगवेगळे आरोप करण्यात आले. ताराराणीच्या भूमीत महिला असलेल्या जयश्री ताईंचा अपमान करण्याचे पातक भाजपने केले. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आजच्या निकालातून भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे.