Special Report | मनसे नेते Sandeep Deshpande गेले कुठे?

Special Report | मनसे नेते Sandeep Deshpande गेले कुठे?

| Updated on: May 08, 2022 | 12:03 AM

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी 4 तारखेला जेंव्हा शिवतीर्थसमोरून इनोव्हा गाडीतून पोलिसांना चकवा देऊन पळाले त्यानंतर पुढे काही अंतरावर जाऊन त्यांनी ती गाडी सोडली आणि ड्रायव्हरला आम्ही दुसऱ्या गाडीने जातो. तू गाडी घेऊन जा असे सांगून निघाले.

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या विविध पथकाकडून त्यांचा शोध घेतला जातोय. मात्र देशपांडे आणि धुरी नेमके कुठे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी 4 तारखेला जेव्हा शिवतीर्थसमोरून इनोव्हा गाडीतून पोलिसांना चकवा देऊन पळाले त्यानंतर पुढे काही अंतरावर जाऊन त्यांनी ती गाडी सोडली आणि ड्रायव्हरला आम्ही दुसऱ्या गाडीने जातो. तू गाडी घेऊन जा असे सांगून निघाले. दोघाचंही शेवटच लोकेशन नेरुळ परिसरात आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहेत.
Published on: May 08, 2022 12:03 AM