Chhagan Bhujbal Video : ‘…असला धंदा करायचा नाही’, छगन भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी
येवला शहर परिसरातील अवैध धंद्यांबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
येवला शहर परिसरातील अवैध धंद्यांबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्याचे पाहायला मिळाले. ‘जे चुकीचं काम करत असतील तुम्ही त्यांना शिक्षा केलीच पाहिजे. मग त्यावर या मंत्र्याचा फोन त्या मंत्र्याचा फोन आला… असला धंदा करायचा नाही. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं. इथे ते काय? जुगार वैगरे… मी पत्त्यासहित कळवलेलं आहे. एकदा बंद झालं परत चालू झालं. काय करतात आपले पोलीस?’, असा थेट सवाल छगन भुजबळांनी केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या अधिकाऱ्यांना सांगून टाकावं. तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी पाठवावं लागले’, असं म्हणत भुजबळांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. अवैध धंद्याबाबत तक्रार केली मात्र धंदे सुरूच असल्याचे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडवायचं नाही. या तालुक्यात शांतता राहिली पाहिजे. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भुजबळांनी कान उघडणी केली.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
