धक्कादायक! नर्सचा डॉक्टरवर बलात्कार, कुठे घडली घटना?

बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेना कुठे महिलांविरोधात गुन्हे घडत असतात.

धक्कादायक! नर्सचा डॉक्टरवर बलात्कार, कुठे घडली घटना?
| Updated on: Mar 03, 2023 | 3:05 PM

कोझीकोडे : महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी 24 वर्षीय पुरुष नर्सला अटक केली. आरोपीने महिला डॉक्टरचे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हा गुन्हा मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात घडला. दोघे कर्नाटकातील हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. पोलिसींनी ही माहिती दिली. कोइम्बतोर येथील रुग्णालयात नोकरीला लावण्याच खोटं आश्वानस देऊन आरोपी नीशाम बाबूने पीडित तरुणीवर अत्याचार केला. डॉक्टर तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार करुन तिचे न्यूड फोटो काढले.

नंबर मोबाइलवर ब्लॉक

त्यानंतर आरोपी नर्सने न्यूड फोटो ऑनलाइन शेअर करण्याची धमकी देऊन महिला डॉक्टरवर वारंवार अत्याचार केला. आरोपीच्या मागणीला कंटाळून पीडित तरुणीने पुरुष नर्सचा नंबर मोबाइलवर ब्लॉक केला.

न्यूड फोटो केले शेअर

त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीचे न्यूड फोटो शेअर केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. नीशाम बाबूवर पोलिसांनी आयपीसीच्या सेक्शन 376 (बलात्कार), 67 A माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.