AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी 3.0 : अजूनही फोन नाही, प्रफुल पटेल यांची संधी हुकणार ? अजित पवार गटाच्या खात्यात काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. मोदी यांच्यासोबत 36 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे यावेळी कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार गटालाही यावेळी एक मंत्रिपद मिळणार आहे, अशी चर्चा होती.

मोदी 3.0 : अजूनही फोन नाही,  प्रफुल पटेल यांची संधी हुकणार ? अजित पवार गटाच्या खात्यात काय ?
| Updated on: Jun 09, 2024 | 11:45 AM
Share

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजपप्रणित एनडीएचे सरकार पुन्हा स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले. नरेंद्र मोदी हे आज ( 9 जून) तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणास असून संध्याकाळी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी समारंभ होणार आहे. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही भाजपच्या चार मंत्र्यांच्या नावाच समावेश असून शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. तर अजितदादा गटाला फक्त एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आज सकाळपासून अनेक नेत्यांना फोन आले असले तरी प्रफुल पटेल यांना मात्र अद्याप फोन आलेल नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

मोदी 3.0 मंत्रिमंडळात समावेशासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहेत. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. रामदास आठवले यांनाही फोन आला आहे. या सर्वांना पीएमओ मधून फोन आले असले तरी अजित पवार गटाचे चर्चेत असलेले नेत प्रफुल पटेल यांना अद्याप कोणताही फोन आलेला नाही. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र  ” मला अजून फोन आलेला नाही, आत्तापर्यंत मला कुठलाही निरोप आलेला नाही, त्याामुळे मी तुमच्याशी काय बोलू, काय सांगू ? ” असं प्रफुल पटेल म्हणाले. थोड्या वेळापूर्वी प्रफुल पटेल, अजित पवार हे सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा त्यांनी माध्यमांसमोर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्यांचा आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश होतो की नाही, अजित दादा गटाच्या नेत्याला कोणतं खातं मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

चहापानाचेही निमंत्रण नाही 

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी चहापान कार्यक्रम होणार आहे. जे खासदार मंत्री होणार आहे त्यांना या चहापानाच्या कार्यक्रमासाठी  आमंत्रण देण्यात आलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदारांना मंत्रिपदाच्या संदर्भात कोणताही कॉल आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोदी 3.0 च्या सरकार मधे स्थान नसलेल्याच पाहायला मिळत आहे.

पटेलांचं नाव आलं होतं समोर 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार, सुनील तटकरे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पटेल हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात होतं.

प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी नागरी आणि उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पक्षाच्या वाट्याला येणारं कॅबिनेट मंत्रीपद नवख्या व्यक्तीकडे देण्याऐवजी अनुभवी व्यक्तीकडे देण्याचा बैठकीचा कल होता. त्यामुळेच पटेल यांना मंत्री करण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं गेलं. पटेल यांना नागरी उड्डाण मंत्रीपद मिळू शकतं अशी चर्चा होती, पण त्याला कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.