Bigg Boss 15 | सलमान खानच्या शोमध्ये झळकणार रिया चक्रवर्ती? तेजस्वी प्रकाशसोबत स्टुडीओ बाहेर दिसल्याने चर्चांना उधाण!

चाहते सलमान खानच्या (Salman Khan) सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या 15व्या (Bigg Boss 15) सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 ऑक्टोबरपासून हा शो टीव्हीवर सुरू होणार आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी, कोणते सेलेब्स या शोचा भाग बनणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे.

Bigg Boss 15 | सलमान खानच्या शोमध्ये झळकणार रिया चक्रवर्ती? तेजस्वी प्रकाशसोबत स्टुडीओ बाहेर दिसल्याने चर्चांना उधाण!
Rhea

मुंबई : चाहते सलमान खानच्या (Salman Khan) सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या 15व्या (Bigg Boss 15) सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 ऑक्टोबरपासून हा शो टीव्हीवर सुरू होणार आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी, कोणते सेलेब्स या शोचा भाग बनणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला गेला, तर रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) या शोचा भाग बनणार आहेत.

माध्यमांच्या अहवालांनुसार, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघींनाही ‘बिग बॉस 15’ची ऑफर देण्यात आली होती. अंकिता लोखंडे यांनी शोचा भाग बनणार असल्याच्या बातम्यांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. पण, अद्याप रियाने हे नाकारलेले नाही.

‘बिग बॉस’ स्पर्धकासोबत झाली स्पॉट

रिया चक्रवर्ती ‘बिग बॉस 15’मध्ये येणार असल्याच्या बातम्या वाढल्या आहेत, कारण ती त्याच स्टुडिओमध्ये दिसली होती जिथे तेजस्वी प्रकाश आणि दलजीत कौर होत्या. तेजस्वी या शोचा एक भाग बनणार आहे आणि एक प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यात तिला ओळखले जाऊ शकते. आता तेजस्वीसोबत त्याच स्टुडिओमध्ये रियाला बघून असा अंदाज लावला जात आहे की, ती सुद्धा या शोचा एक भाग बनणार आहे किंवा प्रीमियर एपिसोडमध्ये ती एक विशेष नृत्य सादरीकरण करताना दिसू शकते.

कॅज्युअल लुकमध्ये दिसली अभिनेत्री

या स्टुडिओमध्ये रिया चक्रवर्ती डेनिम्ससह ग्रे टॉपमध्ये दिसली होती. तिचा लूक कॅज्युअल होता आणि तिने मास्क घातला होता. ‘बिग बॉस 15’ची कन्फर्म स्पर्धक तेजस्वी आणि माजी स्पर्धक दलजीत देखील याच स्टुडीओत दिसले होते.

स्वतःची विशेष काळजी घेतेय रिया

रिया चक्रवर्ती आजकाल स्वतःची विशेष काळजी घेत आहे. ती नुकतीच स्किन क्लिनिकमध्ये गेली. जिथे तिने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. रियाचे चाहते आनंदी आहेत की, अभिनेत्री तिच्या आयुष्यात पुढे जात आहे आणि स्वतःची काळजी घेत आहे. आजकाल सेलेब्स बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी सलूनमध्ये जात आहेत, जेणेकरून ते स्वतःची विशेष काळजी घेऊ शकतील. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रिया नुकतीच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘चेहरे’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

हेही वाचा :

‘ती परत आलीये’मध्ये ‘कुणी तरी येणार येणार गं!’, पाहा कशा प्रकारे चित्रित झालं डोहाळे जेवणाचं गाणं…

Sonakshi Sinha :‘दबंग गर्ल’चा क्लासी अवतार; अनोख्या अंदाजात केलं फोटोशूट, पाहा सुंदर फोटो

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीला अपशब्द बोलणाऱ्या मेहताच्या श्रीमुखात भडकवणार संजना, ‘आई कुठे काय करते’मध्ये दिसणार स्त्रीशक्ती!

अभय देओल पुन्हा प्रेमात? सोशल मीडियावर शेअर केले रोमँटिक फोटो, पाहा कोण आहे ही खास व्यक्ती…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI