
अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ आकारला. त्यानंतर भारताने यामधून मार्ग काढण्यासाठी अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली. विशेष म्हणजे अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लादूनही भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही. अनेक देश यादरम्यानच्या काळात भारताच्या मदतीला धावून आले. रशियासोबतच चीननेही भारताची साथ दिली. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहे. मात्र, जोपर्यंत टॅरिफ 15 टक्क्यांवर येणार नाही, तोपर्यंत व्यापार करार पूर्ण होणार नसल्याची भारताची स्पष्ट भूमिका आहे. भारतावर टॅरिफ लावताना अमेरिकेने भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने टॅरिफ लावत असल्याचे कारण सांगितले. मात्र, चीन सर्वाधिक रशियाकडून तेल खरेदी करणारा देश आहे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, यामुळे अमेरिकेचा दुटप्पीपणा जगापुढे आला.
न्यूझीलंडने भारतासोबत मुक्त व्यापार करार केला. मात्र, यानंतर दुसऱ्या दिवशी भारतासोबत व्यापार करार पूर्ण झाल्यानंतर न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांनी थेट विरोध दर्शवला आणि मोठा धक्का भारताला दिला. यामुळे भारताचे टेन्शन चांगलेच वाढल्याचे बघायला मिळाले. आता न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराचे स्वागत केले.
हेच नाही तर त्यांनी हा करार म्हणजे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले. आम्ही भारतासोबत मुक्त व्यापार करार करू शकलो, ही आनंदाची बाब आहे. या करारातून आर्थिक क्षमतांवर भर देणार आहोत. 1.4 अब्ज भारतीयांसाठी आम्ही आमच्या देशाचे दारे उघडे केले. यामुळे उत्पन्न वाढण्यास आणि अधिक नोकऱ्या मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले. पीटर्स यांनी थेट भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराला विरोध केला. आमच्यासाठी न्यूझीलंड फर्स्ट असल्याचे सांगत त्यांनी या कराराला विरोध केला.
न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार केल्याने भारतासाठी एक मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यामाध्यमातून मोठी उलाढाल होणार आहे. दोन्ही देशांना यातून फायदा होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे भारत सध्या अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करताना दिसत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी काही महत्वाचे करार भारतासोबत केली.