टिटवाळ्यात 22 वर्षीय विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, नराधमांना तासाभरात अटक

पाणी मागण्याच्या बहाण्याने हे दोन्ही नराधम घराजवळ आले. त्यानंतर घरात घुसून एका 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला.

टिटवाळ्यात 22 वर्षीय विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, नराधमांना तासाभरात अटक
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 2:16 PM

कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन नराधमांना अवघ्या तासाभरात टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम गाणे आणि बळीराम गायकवाड असं या नराधमांचं नाव आहे (Titwala Gang Rape Case).

पाणी मागण्याच्या बहाण्याने हे दोन्ही नराधम घराजवळ आले. त्यानंतर घरात घुसून एका 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणीय टिटवाळा पोलिसांनी दोन्ही नराधमांना गुन्हा दाखल होण्याच्या एक तासातच अटक केली आहे.

कल्याण जवळ टिटवाळा येथील कांबा परिसरात शनिवारी संध्याकाळी एका 22 वर्षीय विवाहित महिला तिच्या घरी असताना दोन तरुण तिच्या घराजवळ आले. दोघांनी महिलेकडून पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पाणी घेण्यासाठी घरात गेली असता तिची पाठ वळतात तिच्या मागे हे दोघेही जण महिलेच्या घरात घुसले.

दोघांनी महिलेवर बलात्कार केला. या दरम्यान तिला मारहाणही करण्यात आली. त्यानंतर हे दोघे आरोपी पळून गेले. याबाबत टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी सांगितले, की आधी महिलेने टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताना फक्त मारहाण झाल्याचे सांगितले होते. मात्र, अधिक चौकशी केली असता तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत अवघ्या एका तासाच्या आत गौतम गाणे आणि बळीराम गायकवाड या दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे टिटवाळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Titwala Gang Rape Case

संबंधित बातम्या :

नंबर प्लेटला पिवळा रंग फासून रिक्षातून फिरणारे प्रवासी निघाले चोर, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रेमात अडथळा ठरत असल्याने नवऱ्याचाच केला खून; दीर-भावजयीला बेड्या

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.