पावसाचा हाहाकार, जीवितहानीच्या घटना वाढल्या, नांदेडमध्ये आमदारांच्या नातेवाईकांचा मृत्यू, नंदुरबारमध्ये उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

मराठवाड्यात झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळं अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे.

पावसाचा हाहाकार, जीवितहानीच्या घटना वाढल्या, नांदेडमध्ये आमदारांच्या नातेवाईकांचा मृत्यू, नंदुरबारमध्ये उपचाराअभावी महिलेचा मृत्यू
नांदेडमध्ये दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 1:45 PM

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यात झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळं अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. नांदेड डिल्ह्यातील विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या चुलत बंधूंचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

मुखेड तालुक्यातील मोती नाल्याच्या पुराच्या पाण्यात कारसह वाहून गेलेले पिता पुत्रांचा मृतदेह सापडलाय. नाल्या पासून 500 मीटर अंतरावर दोन्ही मृतदेह सापडले आहेत. भगवान राठोड आणि संदीप राठोड या पिता पुत्राचा मृतदेह सापडला असून 24 तासानंतर हे मृतदेह सापडले.मृत पावलेले पितापुत्र माजी आमदार किशन राठोड यांचे मुलगा आणि नातू आहेत तर विद्यमान आमदार तुषार राठोड यांचे चुलत बंधू आणि पुतणे होते.

जालना जिल्ह्यात चौघे वाहून गेले एकाचा शोध सुरु

परतूर तालुक्यातील बाम्हणी – वलखेड या ओढ्याच्या पुरामध्ये 4 जण वाहून गेले होते. या 4 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, आसाराम खालापूरे या व्यक्तीचा 12 तास होऊन शोध न लागल्याने, आता परतूर अग्निशमन दल या व्यक्तीचा बोट द्वारे या शोध घेणार आहे.

हिंगोलीच्या कळमनुरीत एकाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील एलकी येथील लखन गजभारे हा 23 वर्षीय तरुण काल रात्री कामठा फाटा ते एलकी या रस्त्यावरील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला होता. घटनास्थळाच्या काही अंतरावर या तरुणाचा आज सकाळी उसाच्या फडात मृतदेह सापडला. सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथील उद्धव काळे हा 35 वर्षीय मेंढपाळ तीन दिवसांपासून मेंढ्या वळताना पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेला होता त्याच शिवारात काही अंरावर या मेंढपाळाचा आज सकाळी मृतदेह सापडला.

नंदुरबारमध्ये दरड कोसळून रस्ता बंद, उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात दरड कोसळून घाट बंद झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात पोहोचू न शकलेल्या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नंदुरबार मधल्या चांदसैली घाटातील ही घटना आहे. कालपासून घाटात दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. सिदलीबाई पाडवी या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले जात होते. रस्ता बंद असल्याने सीधलीबाई पाडवी ला खांद्यावर टाकून पायी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रवासादरम्यान तिचा मृत्य झाला.

सोलापुरात गावकऱ्यांनी वाचवला तरुणाचा जीव…!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव येथे पुराच्या पाण्यात वाहत जात असताना गावकऱ्यांनी युवकाचे प्राण वाचवले. मात्र, दुचाकी मात्र वाहून गेली आहे. अबुझर बासित सौदागर असे युवकाचे नाव असून ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरी टाकून वाहत्या पाण्यातून बाहेर काढून प्राण वाचविले आहेत.प्रशासनाने पुलाची ऊंची वाढविण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

भंडाऱ्यात भिंत कोसळल्यानं कारचा चुराडा

सोमवारी रात्री पासून सुरु आलेल्यां संततधार पावसामुळे घराची भिंत रस्त्यावर कोसळून उभ्या कारचा चुराडा झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या घडली. वरठी येथील सुभाष वार्ड येथे घडली असून बाजूला असलेल्या दोन घराचे छत ही कोसळले आहेत. यात घर व कार पकडून 13लाखांचे नुकसान झाले आहे. वरठी परिसरात दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. त्यात सुभाष वार्ड येथील दाटवस्तीत मुख्य रस्त्यावर विष्णू कोर्वेकर यांच्या दुमजली कवलारू घर असून सकाळी अचानक घराची भिंत कोसळली. संततधार पावसाने जीर्ण झाल्याने सदर घराची भिंत रस्त्यावर कोसळली. यामध्ये ती भिंत अंजना नाईक यांच्या कारवर पडली. यात त्यांच्या कारचा अक्षरश चुराडा झाला. मात्र, या घटनेती जीवीतहानी झालेली नाही.

बीड जिल्ह्यात बिंदुसरा नदील पूर, गायी वाहून गेल्या

बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. या पुरामध्ये जवळपास सहा गायी वाहून गेल्यात. शहरातील दगडी पुलावरील ही घटना आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं बिंदुसरा नदी खळखळून वाहते आहे. अशातच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाहून गेलेल्या गायींची शोध मोहिम हाती घेण्यात आलीय. पेठ बीड भागाला जोडणाऱ्या दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यानं सुभाष रोडवरून वाहतूक वळवण्यात आलीय.

इतर बातम्या:

देव तारी त्याला कोण मारी, दरड दुर्घटनेत दुचाकीस्वार बचावले, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशकासाठी अतिवृष्टीचा अलर्ट, जिल्ह्याला पावसाने झोडपले

Maharashtra Rain Update Two died in Nanded women died in Nandurbar due to not get treatment because road closed after landslide

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.