New Parliament | जगाला हेवा वाटेल अशी मोदींच्या स्वप्नातील संसद! इथं फर्स्ट लूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट' अंतर्गत लवकरच भारताच्या नव्या संसदेचं काम सुरु होणार आहे.

New Parliament | जगाला हेवा वाटेल अशी मोदींच्या स्वप्नातील संसद! इथं फर्स्ट लूक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ अंतर्गत लवकरच भारताच्या नव्या संसदेचं काम सुरु होणार आहे. मोदी 10 डिसेंबर रोजी या नव्या संसदेचं भूमिपूजन करणार आहेत. नव्या संसदेची निर्मिती करताना मोदी सरकारने जुन्या संसद भवनात जागेची कमतरता आणि भविष्याच्या दृष्टीने मर्यादा असल्याचं सांगितलं आहे. ही नवी संसद इमारत त्रिकोणी रचनेत असणार आहे. यानुसार सध्याच्या राष्ट्रपती भवन ते थेट इंडिया गेटपर्यंतच्या 3 किलोमीटरच्या राजपथच्या दोन्ही बाजूला या इमारती उभारल्या जाणार आहे. त्यासाठी संसद, सरकारी कार्यालये आणि निवासस्थानांच्या जुन्या इमारती हटवल्या जाणार आहे (PM Modi to lay foundation stone of new parliament know how it will be).

नवं संसद भवन कसं असणार?

नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळेच विरोधकांनी कोरोनाच्या काळात हा अनावश्यक खर्च केल्याचा आरोप करत मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. हे बांधकाम सध्याच्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण होण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. 2022 मध्येच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची ही नवी इमारतीचा विस्तार जवळपास 65,000 चौरसमीटर इतका असेल. याशिवाय या इमारतीचं 16921 चौरसमीटर बांधकाम जमिनीखालीही होणार आहे.

संसदेची नवी इमारतही 3 मजली असणार आहे. यात एक ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर 2 मजले अशी रचना असेल. ही इमारत त्रिकोणी आकारात असेल. आकाशातून पाहिल्यास ही इमारत 3 रंगांमधील किरणांप्रमाणे दिसेल. संसदेतील लोकसभा इमारतीत 900 आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात वाढत्या सदस्य संख्येचा विचार करुन ही संख्या वाढवण्यात आली आहे. नव्या इमारतीतही एका बाकावर दोन खासदार अशीच बैठक व्यवस्था असेल. या बाकाची लांबी 120 सेंटीमीटर असेल. राज्यसभेच्या नव्या इमारतीत 400 आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नव्या संसद भवनात एक संविधान हॉल असेल. त्यात भारताच्या लोकशाहीचा वारसा असलेल्या गोष्टींचं खुल प्रदर्शन असेल. या शिवाय खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या, खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

जुन्या संसदेचं बांधकाम कुणी केलं?

भारताचं आत्ताचं संसद भवनाचं बांधकाम ब्रिटिश काळात झालं होतं. ब्रिटिश डिझायनर एडविन लुटियंस आणि हरबर्ट बेकर यांनी या इमारतीचा आराखडा तयार केला होता. त्या दोघांनीच नवी दिल्लीची निर्मिती केली होती. या संसदेचं भूमिपूजन 12 फेब्रुवारी 1921 रोजी जालं होतं. याचं बांधकाम पूर्ण होण्यास जवळपास 6 वर्षे लागले. याच्या निर्मितीसाठी 83 लाख रुपये खर्च आला होता. या संसदेचं उद्घाटन 18 जानेवारी 1927 रोजी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इरविन यांनी केलं होतं.

नव्या संसद भवनाच्या निर्मितीचं काम टाटा कंपनीकडे

नव्या संसद इमारतीचं बांधकाम टाटा कंपनी करणार आहे. टाटाने एकूण 6 कंपन्यांना मागे टाकत संसद भवनाच्या बांधकामाचा ठेका मिळवला आहे. टाटा कंपनीने या कामासाठी 61.9 कोटी रुपयांची बोली लावली होती. नव्या संसद भवनाचं डिझाईन गुजरातमधील अहमदाबादच्या विमल पटेल यांनी केलं आहे. पटेल यांनीच मोदींच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे.

हेही वाचा :

शेतकरी विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी एवढी घाई कशासाठी?, प्रफुल पटेलांचा मोदी सरकारला सवाल

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी भाजपची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला, खासदारांना व्हीप

PM Modi to lay foundation stone of new parliament know how it will be

Published On - 6:34 pm, Sat, 5 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI