AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी म्हणाले, सुनील जाखड यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करा, संध्याकाळी शहांशी खलबतं; अमरिंदर सिंग यांच्या मनात चाललं काय?

गेल्या आठ दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात अत्यंत वेगाने घटना घडत आहेत. या सर्व घटना घडामोडींमुळे काँग्रेसचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होताना दिसत आहेत. (Amarinder Singh)

सकाळी म्हणाले, सुनील जाखड यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करा, संध्याकाळी शहांशी खलबतं; अमरिंदर सिंग यांच्या मनात चाललं काय?
Amarinder Singh
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 7:08 PM
Share

नवी दिल्ली: गेल्या आठ दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात अत्यंत वेगाने घटना घडत आहेत. या सर्व घटना घडामोडींमुळे काँग्रेसचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होताना दिसत आहेत. त्यातही कॅप्टन अमरिंदर सिंग यांची विधाने आणि प्रत्यक्ष कृती यांचा ताळमेळ लागत नसल्याने काँग्रेसला बाऊन्सरवर बाऊन्सर बसताना दिसत आहेत.

सकाळी काय म्हणाले?

नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसची डोकेदुखी वाढली. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी काल सिद्धूंची समजूतही काढली. पण सिद्धू काही ऐकले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडाळी अटळ असल्याचं पाहून अमरिंदर सिंग समर्थकांनी विधानसभेत फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली. अमरिंदर सिंग यांच्या या खेळीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली असतानाच सिंग यांनी दुसरा बॉम्ब टाकला. सुनील जाखड यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी करून सिंग यांनी जाखड गटाला फूस दिली. जाखड गटाला फूस देऊन काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण करण्याची सिंग यांची खेळी खेळल्याचं जाणकार सांगतात.

शहांना भेटले

अमरिंदर सिंग यांनी सकाळी जाखड यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी केल्यानंतर संध्याकाळी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सिंग भाजपमध्ये सामील होणार असून त्यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद देण्याचं भाजपमध्ये घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्रीपदासाठी सेटिंग?

दरम्यान, अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये सामील झाल्यास त्यांना केंद्रात कृषी मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं. तसेच केंद्रीय मंत्रीपद देऊन सिंग यांच्याच नेतृत्वात भाजप राज्यात निवडणुका लढवू शकते. शिवाय भाजपकडून अमरिंदर सिंग यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर केलं जाऊ शकतं. सिंग यांनाही राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं म्हणून त्यांनी तशी सेटिंग केली असावी, असंही जाणकार सांगतात.

भाजप हा मास्टरस्ट्रोक मारणार?

गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. तीन कृषी कायदे बदलण्याची मागणी आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी सर्वाधिक आहेत. त्यामुळे अमरिंदर सिंग यांना कृषी मंत्री करून त्यांच्या मार्फत भाजप कृषी कायदे बदलू शकते. त्यामुळे भाजपला पुढच्यावर्षी पंजाबच्या सत्तेचा सोपान चढण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो. शिवाय पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री दिल्याच्या काँग्रेसच्या फुग्यातील हवा काढण्यासही सोपं जाऊ शकतं. त्यामुळे भाजपकडून ही मोठी खेळी खेळल्या जाऊ शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.

संबंधित बातम्या:

पंजाब काँग्रेसला झटका, कॅप्टन अमरिंदर सिंह अमित शाहांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता, केंद्रातलं मंत्रिपदही ठरल्याची सुत्रांची माहिती

राजीनामा मागं घेण्यासाठी सिद्धूंच्या 3 अटी, हायकमांडची कडक भूमिका कायम, पंजाबमध्ये आता पुढं काय होणार?

उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले

(sunil jakhar’s name has been forward for the punjab congress president by captain amarinder singh)

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.