Varanasi : जपानी पर्यटक माफी मागत राहिले तरी..तरी स्थानिकांनी दिली हीनदर्जाची वागणूक, धक्कदायक व्हिडीओ

वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर परदेशी पर्यटकांसोबत झालेल्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना गर्दीने पर्यटकांशी केलेली वर्तणूक धक्कादायक म्हटली जात आहे.

Varanasi : जपानी पर्यटक माफी मागत राहिले तरी..तरी स्थानिकांनी दिली हीनदर्जाची वागणूक, धक्कदायक व्हिडीओ
Varanasi Viral Video
| Updated on: Dec 28, 2025 | 8:25 PM

वाराणसी: काशी जगात अध्यात्म, संस्कृती आणि आदरातिथ्यासाठी ओळखली जाते. येथे येणारे देश-विदेशातील पर्यटक भारतीय परंपरा आणि गंगा घाटावरील शांतता अनुभवण्यासाठी येत असतात. परंतू वाराणसीशी संबंधित एक संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतू या व्हिडीओने पर्यटकांशी आपण कसे वागतो याचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून प्रथमदर्शनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे समजते.

हा व्हिडीओ गेल्या २५ डिसेंबरचा म्हटला जात आहे. यात ख्रिसमसला दशाश्वमेध घाटावर काही जपानी पर्यटक त्यांच्या कुटुंबासह फिरायला आले होते.यावेळी काही स्थानिकांनी या पर्यटकांना त्रास दिल्याचे उघड जाले आहे. स्थानिक या पर्यटकांना शिवीगाळ करताना दिसत आहेत.

हात जोडून माफी मागताना पर्यटक

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की पर्यटक आणि त्यांचे कुटुंबिय शांत दिसत आहे. एक पर्यटक लोकांची हात जोडून माफी मागताना दिसत आहे. तरीही स्थानिक लोक त्यांना त्रास आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. व्हिडीओत पर्यटक संपूर्णपणे शांत असून कोणताही प्रतिकार करताना दिसत नाहीत.

पुराव्याशिवाय लावले गंभीर आरोप

स्थानिक माहितीनुसार गर्दीत उपस्थितीत एका व्यक्तीने जपानी पर्यटकांवर गंगेत लघवी केल्याचा आरोप केला. परंतू या आरोपाचा कोणताही पुरावा समोर आला नाही. तरीही त्या परदेशी पर्यटकांसोबत अशा प्रकारे वर्तणूक करण्यात आली की आता लोक प्रश्न करत आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की कोणताही ठोस पुरावा नसताना अशा प्रकारे पाहुणे म्हणून मित्र देशातून आलेल्या पर्यटकांसोबत असे वागणे शोभा देत नाही.

येथे पाहा व्हिडीओ –