कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नाहीत म्हणून कंपनीचा नियम! विषय झाला चर्चेचा, व्हायरल

कर्मचाऱ्यांच्या कामासाठी काही मर्यादा निश्चित केल्या गेलेल्या आहेत. पण एका कंपनीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि या कंपनीने एक विचित्र नियम बनवला आहे. हा नियम असा की कामात कमकुवत असणारे कर्मचारी...

कर्मचारी टार्गेट पूर्ण करत नाहीत म्हणून कंपनीचा नियम! विषय झाला चर्चेचा, व्हायरल
Rule in company
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 01, 2023 | 5:56 PM

खाजगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले जाते. कधी ही टार्गेट्स पूर्ण होतात तर कधी टार्गेट्स पूर्ण होत नाहीत. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामासाठी काही मर्यादा निश्चित केल्या गेलेल्या आहेत. पण एका कंपनीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि या कंपनीने एक विचित्र नियम बनवला आहे. हा नियम असा की कामात कमकुवत असणारे कर्मचारी एकमेकांना कानाखाली मारणार. कामात चांगले नसणारे कर्मचारी सर्वांसमोर एकमेकांना कानशिलात लगावतील. आता हा नियम चर्चेत आहे.

कमी कामगिरी करणारे कर्मचारी

वास्तविक, हे प्रकरण हाँगकाँगच्या विमा कंपनीशी संबंधित आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने आपल्या एका वृत्तात याबाबत माहिती दिली आहे. अहवालानुसार, कंपनीने एक आदेश पारित केला आहे. त्यात म्हटले आहे की, वार्षिक डिनरच्या निमित्ताने खराब कामगिरी असलेले कर्मचारी एकमेकांच्या कानशिलात लगावतील.
ज्या कर्मचाऱ्यांचे टार्गेट पूर्ण होत नाही ते असं करणार, तेही सर्वांसमोर.

रिपोर्टनुसार, कंपनीशी संबंधित एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी दावा केला की कंपनीच्या अधिकाऱ्याने अशा सुमारे डझनभर कर्मचाऱ्यांना स्टेजवर उभे केले, ज्यांची कामगिरी कमकुवत होती. यानंतर त्यांना एकमेकांना कानाखाली मारण्यास सांगण्यात आले. हे सर्व कर्मचारी होते ज्यांचे टार्गेट पूर्ण होऊ शकले नाही.

यानंतर त्यांनी एकमेकांना चोपले. या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. त्याचबरोबर यावर लवकरच कारवाई होऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.