गोपीचंद पडळकर पुन्हा पवार कुटुंबावर बरसले, ‘रोहित पवार छोटे पिल्लू…’, माझ्यावर कधीही हल्ला…’
पवारांनी डॉ. आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष फोडला. धनगर फोडला. पवारांना मताचे राजकारण करायचे आहे. पहिल्यादा चौडी येथे आले. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अहिल्यादेवी यांच्या नावाने काही सुरु केले नाही. मागील अनेक वर्षापासून सुरु असलेली धनगर आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलीय.
धाराशिव : 12 ऑक्टोबर 2023 | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या धनगर जागर यात्रेला सुरुवात झालीय. धाराशिव येथील सभेत बोलताना आमदार पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केलीय. धनगर जागर यात्रा काढणार म्हटल्यावर लबाड लांडग्यांच्या पिलावळीने लगेच अफवा उठवायला सुरुवात केली. एकीकडे नातू आणि मुलगी म्हणते, धनगर समाजाला आरक्षण मिळावे. मात्र, शरद पवार आदिवासी मेळाव्यात जाऊन म्हणतात की आदिवासी समाजाच्या आरक्षणात कोणालाही घुसू देणार नाही. म्हणजे पवार हे दोन्हीकडून बोलत आहेत. चौडी येथे लबाड लांडग्याचे छोटे पिल्लू आमदार झाल्याने पहिल्यांदा 2022 ला राजकारण झाले. दगडफेक गाडीवर केली तरी मी थांबलो नाही. माझं काही बर वाईट होऊ शकतो. हल्ला होऊ शकतो. पण, मी भीत नाही. काही झाले तर ही आरक्षण चळवळ हातात घ्या असे ते म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

