Video : संभाजीराजेंना फसवण्याचं काम मविआ सरकारनं केलं – गोपीचंद पडळकर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बारामतीला जाताना एका ठराविक रस्त्याने पाहुण्यांना घेऊन जातात आणि म्हणतात, बारामतीचा विकास झाला, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. ते पुरंदर याठिकाणी बोलत होते. पडळकरांच्या नेतृत्वात महाविका आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी त्यांनी पवारांवर टीका केली तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 23, 2022 | 4:01 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बारामतीला जाताना एका ठराविक रस्त्याने पाहुण्यांना घेऊन जातात आणि म्हणतात, बारामतीचा विकास झाला, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. ते पुरंदर याठिकाणी बोलत होते. पडळकरांच्या नेतृत्वात महाविका आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी त्यांनी पवारांवर टीका केली तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. या राज्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले म्हणून यांनी वीज कनेक्शन (Electricity) तोडणी तात्पुरती थांबवली आहे. मात्र राज्यात लोडशेडिंग सुरूच आहे. आठ-आठ तास भारनियमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें