थंडीत वरदान आहेत या Seeds, संपूर्ण सिझन रहाल हट्टेकट्टे

9 DEC 2025

थंडीत मोसमी भाज्या आणि फळे खाणे चांगले असते. तसेच काही बिया देखील शरीराला आतून ऊर्जा देत असतात.

भाज्या, फळे याबरोबर थंडी ड्रायफ्रुट्स खाणे चांगले असते. तसेच अनेक बिया देखील पोषक असतात. त्यांनाही डाएटचा भाग बनवावे

 तिळ थंडीत खाणे चांगले असते. त्याने शरीरात उष्णता वाढते. हाडे, स्नायू, ब्रेन आणि हार्टला फायदा होतो. 

 तिळाची चिक्की, लाडू, किती खावे याची माहिती तज्ज्ञांकडून घेऊयात...

 जयपूरच्या आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते तिळ खाताना, वय, जेंडर, डायजेशन आणि वजन याचा विचार करावा. जर तुम्ही सामान्य व्यक्ती आहात तर दोन चमचे रोज तिळ खाऊ शकता

 जर तुम्हाला एसिडीटी  किंवा बद्धकोष्ठता असेल तर रोज भिजवलेले एक चमचा तीळ खाणे पुरेसे, त्यामुळे ते पचतील

कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचा कोणताही आजार असेल तर तिळ कमी खावेत.