Video : दारु पिऊन सतत त्रास आणि मारहाण, वैतागलेल्या पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला

| Updated on: Aug 13, 2021 | 12:24 PM

'पती दारु पिऊन सतत त्रास देतो, मारहाण करतो... गेले कित्येक दिवस अशा त्रासाला सामोरं जावं लागलंय', असं सांगत वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला. या महिलेने हातात कात्री घेऊन तिच्या पतीला जखमी केलं. अकोला शहरातील ही घटना आहे.

Video : दारु पिऊन सतत त्रास आणि मारहाण, वैतागलेल्या पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला
Follow us on

अकोला : ‘पती दारु पिऊन सतत त्रास देतो, मारहाण करतो… गेले कित्येक दिवस अशा त्रासाला सामोरं जावं लागलंय’, असं सांगत वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला. या महिलेने हातात कात्री घेऊन तिच्या पतीला जखमी केलं. अकोला शहरातील ही घटना आहे.

नेमकं प्रकरण काय?

अकोला शहरात रात्रीच्या सुमारास कौटुंबिक वादातून पत्नीकडून पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शहरातल्या मोठी उमरी भागातल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पती-पत्नीचं जोरदार भांडण झालं.

दारू पिऊन पती मारत असतो असे ती महिला सांगत होती… म्हणून त्याला मी आज रोडवर सर्वांसमोर मारत असल्याचे संबंधित पत्नी उपस्थितांना सांगत होती…यावेळी महिलेने हातात कैची घेऊन तिच्या पतीला जखमी केले असून संबंधित पती – पत्नी नेमके कुठले आहेत,आणि कोण आहेत?, हे अद्याप कळू शकले नसून स्थानिक नागरिकांनी मध्यशी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

नागपुरात वाढती गुन्हेगारी

नागपुरातील गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. आज (11 ऑगस्ट) अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वकर्मा नगर येथे सशस्त्र हल्ल्याची घटना घडली. पाच आरोपींनी दोघांवर शस्त्रांनी हल्ला केला. यात दोघेही गंभीर झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपी आणि जखमींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद

मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी घटना घडली. या परिसरात पाच जणांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे आरोपी आणि जखमी यांच्यात जुनी ओळखी आहे. दोन दिवसांपूर्वी काही कारणांमुळे आरोपी आणि जखमींमध्ये वाद झाला होता. आज दुपारी हा वाद पुन्हा चिघळला. त्यानंतर यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यामुळे एका गटातील पाच जणांनी दुसऱ्या गटातील दोघांवर सशस्त्र हल्ला केला.

शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढल्याचा आरोप

हा हल्ला भीषण असल्यामळे यात दोघे जंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांनी कारवाई केली असली तरी अशा प्रकारचे गुन्हे रोजच घडत आहेत. दररोज घडणाऱ्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढल्याचा आरोप केला आहे.

(harassment and beatings due to alcohol, Women attack on the husband Akola Maharashtra Video Viral On Social Media)

हे ही वाचा :

सोशल मीडियावर ओळख, विधवा महिलेशी मंदिरात लग्न, शारीरिक संबंध ठेवत दोन लाखांना फसवणूक

अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली, महिलेला अटक