दोन्ही मुलांचे मृतदेह सुटकेसमध्ये सांभाळून ठेवले, अखेर महिलेला पोलिसांनी केले जेरबंद

| Updated on: Sep 15, 2022 | 5:07 PM

एवढ्या कमी वेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोपीला अटक करणे दोन्ही देशांच्या समन्वयामुळंचं शक्य झालं.महिलेला अटक करण्यासाठी अरेस्ट वारंट जारी करण्यात आलंय.

 दोन्ही मुलांचे मृतदेह सुटकेसमध्ये सांभाळून ठेवले, अखेर महिलेला पोलिसांनी केले जेरबंद
दोन मुलांचे मृतदेह सुटकेसमध्ये बंद
Follow us on

न्यूझिलंड पोलिसांनी दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी एका महिलेला दक्षिण कोरियात (South Korea) अटक केली. गेल्या महिन्यात एका सुटकेसमध्ये (Suitcase) दोन मुलांचे मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडले होते. आकलंडमधून आणण्यात आलेल्या एका सुटकेसमध्ये अनोळखी मृतदेह सापडले होते. याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. हे मृतदेह कुठून आले नि कुणी ठेवले असतील, याची मोठी चर्चा झाली. कोरियन पोलिसांनी (Korean Police) दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेह कित्तेक दिवसांपासून सुटकेसमध्ये ठेवले होते.

न्यूझिलंड-दक्षिण कोरियाचे संयुक्त मिशन

सापडलेल्या मृतदेहांचे वय जवळपास 7 व 10 वर्षे आहे. न्यूझिलंड पोलिसांनी दक्षिण कोरियाच्या महिलेल्या प्रत्यार्पणाची मागणी केली. न्यूझिलंड पोलिसांनी गेली तीन आठवडे दक्षिण कोरियाच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत संयुक्त मिशन राबविले.या माध्यमातून आरोपी महिलेपर्यंत पोहचता आले.संबंधित महिला 40 वर्षांची आहे.

दोन्ही देशांमिळून कारवाई

तपास अधिकारी, टोफिलाऊ म्हणाले, एवढ्या कमी वेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोपीला अटक करणे दोन्ही देशांच्या समन्वयामुळंचं शक्य झालं.महिलेला अटक करण्यासाठी अरेस्ट वारंट जारी करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

प्रत्यार्पणाची मागणी

न्यूझिलंड पोलिसांनी दक्षिण कोरिया पोलिसांना मदतीची मागणी केली. आरोपी महिलेला जमानत मिळता कामा नये, यासाठी प्रयत्न केले. आता तिच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. न्यूझिलंडमध्ये आणून तिच्यावर कारवाई केली जाणार आहे. दोन्ही मुलं आणि आरोपी महिलेचे जवळचे संबंध होते. हे कुटुंबीय आकलंडमध्ये राहत होते. मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

महिलेचे आणि मुलांचे संबंध काय

ज्याठिकाणी मृतदेह सापडला होता त्या कुटुंबीयांशी काही संबंध नव्हता. परंतु, त्यांचीही विचारपूस केली जात आहे.महिलेचा आणि मुलांचा काय संबंध आहे, याचा तपास न्यूझिलंड पोलीस करत आहेत.