AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : साहेब, हिला हिच्या बॉयफ्रेंडसोबत राहू दे, कारण…पोलीसही ऐकून सुन्न झाले, चार मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध

Extramarital Affair : एका 40 वर्षाच्या महिलेचा 24 वर्षाच्या युवकावर जीव जडला. ती त्याच्या प्रेमात पडली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच आणि मुलाच चार वर्षांपासून अफेअर सुरु होतं. पती नोकरीसाठी मुंबईत असायचा. पतीला वाटलं की, सर्व काही आता व्यवस्थित झालय. पण तो चुकीचा होता.

Extramarital Affair : साहेब, हिला हिच्या बॉयफ्रेंडसोबत राहू दे, कारण...पोलीसही ऐकून सुन्न झाले, चार मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध
Extramarital Affair
| Updated on: Jul 23, 2025 | 1:25 PM
Share

आजच्या तारखेला विवाहबाह्य संबंध असणं अजिबात नवीन राहिलेलं नाही. अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत, ज्यात पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराला धोका देतात, बाहेर त्यांचं अफेअर सुरु असतं. एका 40 वर्षाच्या महिलेचा 24 वर्षाच्या युवकावर जीव जडला. ती त्याच्या प्रेमात पडली. महिला विवाहित आहे. तिला पती आणि पदरात चार मुलं आहेत. पण त्यांची पर्वा केल्याशिवाय ती प्रियकरासोबत पळून गेली. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमधील हे प्रकरण आहे.

नवऱ्याला या बद्दल समजल्यानंतर तो धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. महिला सुद्धा तिथे पोहोचली. तिने सांगितलं, साहेब, मी माझ्या प्रियकरासोबत कोर्ट मॅरेज केलय. आता मी याच्यासोबत राहणार नाही. हे ऐकून पती हैराण झाला. त्यानंतर पती जे काही बोलला, ते ऐकून पोलीस सुन्न झाले.

पतीला वाटलं की, सर्व काही आता व्यवस्थित झालय, पण….

भवानीगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावच हे प्रकरण आरहे. चार मुलांच्या आईने नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच आणि मुलाच चार वर्षांपासून अफेअर सुरु होतं. पती नोकरीसाठी मुंबईत असायचा. बायकोच्या अफेअरबद्दल समजताच गावी परतला. त्यानंतर महिलेला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हतं. तिला पती मार्गात अडथळा वाटू लागला. मग, एकदिवस महिला प्रियकरासोबत पळून गेली. पण अचानक तिच्या मनाला काय वाटलं काय माहित, ती पुन्हा पतीकडे आली. पतीला वाटलं की, सर्व काही आता व्यवस्थित झालय. पण तो चुकीचा होता.

हे ऐकून पोलीसही दंग राहिले

काही महिने पतीसोबत राहिल्यानंतर महिला पुन्हा पती आणि चार मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोघांना चौकीत बोलावलं. यावेळी महिलेने पोलिसांना कोर्ट मॅरेज केल्याची माहिती दिली. प्रियकरासोबत रहायचं असल्याच तिने सांगितलं. पती त्यावेळी पोलिसांना म्हणाला की, साहेब हिला ज्याच्यासोबत रहायचं आहे, त्याच्यासोबत राहू दे. नाहीतर, ही मला विष घालून मारुन टाकेल. त्यामुळे हिला जे काही करायचय ते करुं दे. मी माझ्या चार मुलांचा एकटा संभाळ करीन. हे ऐकून पोलीसही दंग राहिले. कुठला पती इतक्या सहजतेने पत्नीला कोणा दुसऱ्यासोबत कसं जाऊ देईल. पण निर्णय पतीचा होता. त्यांनी महिलेला तिच्या प्रियकरासोबत जाऊ दिलं. इथे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.