
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न केलं नाही. त्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं काहीही नाही… पण अनेक अभिनेत्रींनी करीयरला प्राधान्या दिलं आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री जया भट्टाचार्य देखील वयाच्या 47 व्या वर्षी एकटीच आयुष्य जगत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत खलनायकाच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या जया हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
जया भट्टाचार्य प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली, पण हा प्रवास तिच्यासाठी फार कठीण होता. दरम्यान, नुकताच झालेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे.
जया हिने स्वतःपेक्षा वयाने 19 वर्ष मोठ्या असलेल्या दिग्दर्शकाला डेट केलं आहे. तब्बल 11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर देखील त्यांनी लग्न केलं आहे. जया म्हणाल्या, ‘मी प्रसिद्ध दिग्दर्शक मजाहिर रहीम यांच्यासोबत बराच काळ लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होती. याच दरम्यान मला कास्टिंग काईचाच देखील सामना करावा लागला…’
‘रहीम उच्च शिक्षित आणि हुशार होते. आमच्या दोघांमध्ये 19 वर्षांचं अंतर होतं. त्यांच्या मनात कायम मला गमावण्याची भीती असायची…. मी त्यांची प्रचंड आभारी आहे… ते भेटले नसते तर, माहिती नाही किती भेटले असते… मी 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती.’
’11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर काही महिने मी विभक्त झाले. तेव्हा मला कळलं की, मी एका पिंजऱ्यात बंद होती. त्यांनी मला सुरक्षित ठेवलं होतं. सुरुवातील रहीम यांच्यासोबत लग्न करण्याचा विचार केला. पण 5 वर्षांनंतर लग्नासाठी माझा नकार होता. रहीम यांना लग्न करायचं होतं.’
पुढे अभिनेत्री म्हाणाली, ‘रहीम यांना मुल हवं होतं. पण मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. मला माझ्या आई – वडिलांची काळजी घ्यायची होती. बाळ रडल्यानंतर त्याला लॉलीपॉप देण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
जया भट्टाचार्य एका NGO सोबत काम करते. भटक्या कुत्र्यांची त्या काळजी घेते. तिने काम करताना अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर जया कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.