हिंगणघाट जळीतकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, दिग्गज वकील खटला लढणार

| Updated on: Feb 05, 2020 | 10:12 AM

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या तरुणीजळीत प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात (Wardha Hinganghat teacher burn case) येणार आहे.

हिंगणघाट जळीतकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, दिग्गज वकील खटला लढणार
Follow us on

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या तरुणीजळीत प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात (Wardha Hinganghat teacher burn case) येणार आहे. हा खटला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लढतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गृहमंत्री देशमुख यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची Wardha Hinganghat teacher burn case) मंगळवारी रात्री भेट घेतली. नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील केसवानी हेदेखील यावेळी उपस्थित होते. डॉक्टर केसवानी आणि अनिल देशमुख यांनी पीडित तरुणीवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सुमारे पाऊण तास गृहमंत्री देशमुख आणि डॉक्टर केसवानी यांनी रुग्णाचे कुटुंबीय आणि डॉक्टरांशी चर्चा केली.

पीडित तरुणीवर योग्य उपचार होत असून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचं डॉक्टर केसवानी यांनी सांगितले. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर असल्याचंही डॉक्टर केसवानी यांनी सांगितले. तर झालेला प्रकार हा निंदनीय आहे, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवू. तसेच हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे उज्वल निकम यांची नियुक्ती करू असेही देशमुख यांनी सांगितलं.

हिंगणघाटमध्ये सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकूनजिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात (Wardha Hinganghat teacher burnt case) आला. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.

आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी 

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला काल (4 फेब्रुवारी) न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचा पाच दिवसांचा रिमांड मागितला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. परिसरात तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांनी गुप्तरित्या आरोपीला न्यायालयात हजर करत तातडीने रवानाही केलं.

पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून

हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार आहे. नुकतंच याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या पीडितेव तरुणीवर योग्य ते उपचार करावेत, या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

पीडितेला न्याय देण्यासाठी ‘हिंगणघाट बंद’ची हाक

पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय काल रस्त्यावर उतरला होता. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या 

हिंगणघाटच्या पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून, आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी  

हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर, पीडितेसाठी 72 तास महत्त्वाचे